BDL Recruitment 2022 : कोणत्याही परिक्षेशिवाय नोकरी करण्याची सुवर्णसंधी! संरक्षण मंत्रालयाच्या 'या' कंपनीत भरती
BDL Recruitment 2022 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संरक्षण मंत्रालयाच्या भारत डायनॅमिक्स लिमिटेड कंपनीने विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.
BDL Recruitment 2022 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संरक्षण मंत्रालयाच्या भारत डायनॅमिक्स लिमिटेड कंपनीने देशभरातील विविध कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या प्रकल्पांसाठी विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. कंपनीने जारी केलेल्या भरतीच्या जाहिरातीनुसार, विविध विभागांमध्ये प्रकल्प सहाय्यक आणि प्रकल्प पदविका सहाय्यक अशा एकूण 80 पदांची भरती केली जाणार आहे. जाणून घ्या सविस्तर
एकूण 80 पदांची भरती
ही भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. ही भरती एका वर्षाची असेल. दर वर्षी तीन वर्षांसाठी कराराचे नूतनीकरण केले जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट bdl-india.in वर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही.
भारत डायनॅमिक्स भर्ती 2022 पदांची संख्या
एकूण पदांची संख्या- 80
भारत डायनॅमिक्स भर्ती 2022 महत्वाची तारीख
अर्ज सुरू करण्याची तारीख: 14 मे 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 जून 2022
भारत डायनॅमिक्स भरती 2022 वयोमर्यादा
उमेदवाराचे वय 28 वर्षे असावे. तर SC, ST ला 5 वर्षे, OBC ला कमाल तीन वर्षांच्या वयोमर्यादेत सूट मिळेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- MPSC Exam : मोठी बातमी! राज्य पूर्व परीक्षा 21 ऑगस्टला होणार, 161 पदांसाठी भरती
- MPSC Recruitment 2022 : लोकसेवा आयोगामध्ये 10वी उत्तीर्णांसाठी जागा रिक्त, 12 मे पूर्वी अर्ज करा
- NEET PG 2022 : नीट पीजी परीक्षेचं हॉल तिकीट लवकरच होणार जारी; डाऊनलोड कुठून कराल?
- IPPB Recruitment 2022 : बँकेत ग्रामीण डाक सेवक पदांसाठी मोठी भरती; अर्ज प्रक्रिया सुरु, जाणून घ्या सविस्तर
भारत डायनॅमिक्स भर्ती 2022 निवड कशी केली जाईल?
पात्रता परीक्षेतील गुण, पूर्वीचा अनुभव आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. उमेदवारांच्या अर्जाच्या तपशिलांच्या आधारे तयार केलेल्या यादीनुसार उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.