एक्स्प्लोर
एबी, विराटची सैराट खेळी, गुजरातवर 144 धावांनी विजय
बंगळुरू: एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली या रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरुच्या फलंदाजांनी आज चिन्नास्वामी स्टेडियम दणाणून सोडलं. डिव्हिलियर्सनं नाबाद 129 धावा फटकावल्या. तर विराटनं 109 धावांची खेळी केली. त्या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी तब्बल 229 धावांची भागीदारी रचली.
विराटचं हे आयपीएलमधलं तिसरं शतक असून आयपीएलच्या एकाच मोसमात तीन शतकं ठोकणारा विराट पहिलाच फलंदाज ठरला आहे. डिव्हिलियर्स आणि विराटच्या शतकांमुळं 20 षटकात 3 बाद 248 धावांची मजल मारता आली. बंगलोरच्या गोलंदाजांनी मग गुजरातला 104 धावांत गुंडाळलं आणि तब्बल 144 धावांनी विजय साजरा केला.
-=-------------
: आयपीएलमध्ये गुजरातविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांनी झंझावती शतकं ठोकली. कोहलीने 55 चेंडूत वादळी 109 धावा केल्या, तर डिव्हिलियर्सने अवघ्या 52 चेंडूत नाबाद 129 धावा ठोकल्या.
या दोघांच्या झंझावती खेळीमुळे आरसीबीला 20 षटकात 3बाद 248 धावा करता आल्या.
या सामन्यात आरसीबीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
कोहलीने आपल्या खेळीदरम्यान 5 चौकार आणि 8 षटकार ठोकले. तर डिव्हिलियर्सने 52 चेंडूत 10 चौकार आणि 12 षटकारांच्या सहाय्याने नाबाद 129 धावा केल्या.
कोहलीचं यंदाच्या आयपीएलमधील तिसरं शतक आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement