एक्स्प्लोर
एबी डिव्हिलियर्स भारताचा नागरिक होणार?
![एबी डिव्हिलियर्स भारताचा नागरिक होणार? Video Ab De Villiers To Talk To Narendra Modi For Indian Citizenship एबी डिव्हिलियर्स भारताचा नागरिक होणार?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/19025241/ABD_BCCI31-580x395-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : आयपीएलच्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. इतकंच नाही तर बंगलोरच्या ख्रिस गेलने या दोघांनी तुलना बॅटमॅन आणि सुपरमॅनशी केली आहे. विराट कोहली बॅटमॅन तर एबी सुपरमॅन असल्याचं गेलचं म्हणणं आहे.
विराट आणि एबीने मिळून 1200 हून अधिक धावा केल्या आहे. शिवाय चार वेळा 100 हून अधिक धावांची भागीदारी रचली आहे. तसंच आयपीएलच्या यंदाच्या मोसमात अनेक विक्रमही मोडले आहेत.
विराट आणि डिव्हिलियर्स मैदानात एकमेकांना अतिशय कम्पॅटिबल आहेत. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेचा हा खेळाडू भारतीय क्रिकेट संघासाठी खेळावा, असं स्वप्न भारताचे क्रिकेटचाहते पाहत आहेत.
इतकंच नाही तर स्वत: एबी डिव्हिलियर्सही भारताच्या नागरिकत्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलण्याचा विचार करत आहे.
नुकतंच आरसीबीच्या डिजीटल टीमचा सदस्य मि. नाग्जने एबीला याबाबत विचारलं की, "तू बराच काळ भारतात असतोस, तर भारतीय नागरिकत्व का स्वीकारत नाहीस?" यावर सुपरमॅन एबी म्हणाला की, "नागरिकत्वासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलावं लागेल."
अर्थात हे सगळं थट्टेत सुरु होतं. पण भारतीय क्रिकेट चाहत्यांना ही कल्पना नक्कीच आवडेल.
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात एबी डिव्हिलियर्सने 11 डावांमध्ये 538 धावा केल्या आहे. यामध्ये 4 अर्धशतक आणि एक नाबाद शतकाचा समावेश आहे, जे त्याने गुजरात लायन्सविरुद्ध ठोकलं होतं.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
भारत
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)