एक्स्प्लोर

दुखापतीमुळे IPL मधून आऊट झालेले परदेशी खेळाडू

मुंबई: आधी टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातली ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांची मालिका, मग ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषक आणि त्यानंतर ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक.. यामुळं भारतीय क्रिकेटरसिकांना ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांचा मिळालेला डोस इतका जबरदस्त होता की, त्यांनी आयपीएल सामन्यांकडे पाठच फिरवलीय. त्यात परदेशातल्या स्टार खेळाडूंवर दुखापतींच्या कारणास्तव आयपीएलमधून माघार घेण्याची वेळ आल्यानं या स्पर्धेचा रंग अगदीच फिका पडलेला दिसतोय.   आयपीएल म्हणजे इंडियन प्रीमियर लीग की, इन्जुअर्ड प्लेयर्स लीग असा प्रश्न सध्या देशभरातल्या क्रिकेटरसिकांना पडलाय. कारण आयपीएलचा यंदाचा जेमतेम अर्धा मोसम संपलाय, पण अनेक दिग्गजांना दुखापतींच्या कारणास्तव आयपीएलमधून माघार घ्यावी लागली आहे.   यंदाच्या मोसमात दुखापतींचा सर्वात मोठा फटका बसलाय महेंद्रसिंग धोनीच्या रायझिंग पुणे सुपरजायंट्सला.. दुखापतीमुळे IPL मधून आऊट झालेले परदेशी खेळाडू *केविन पीटरसन, रायझिंग पुणे सुपरजायंट्स   पुण्याच्या केविन पीटरसनला मोसमातल्या आपल्या चौथ्याच सामन्यात म्हणजे बंगलोरविरुद्धच्या लढतीतून रिटायर्ड हर्ट व्हावं लागलं. उजव्या पायाला झालेल्या दुखापतीमुळं पीटरसननं माघार घेतली.   *फॅफ ड्यू प्लेसी, रायझिंग पुणे सुपरजायंट्स  दुखापतीमुळे IPL मधून आऊट झालेले परदेशी खेळाडू पुण्याचा सलामीवीर फॅफ ड्यू प्लेसीच्या बोटाचं हाड मोडलं. ड्यू प्लेसीला डॉक्टरांनी सहा आठवडे सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिल्यानं, त्याला आयपीएलच्या उर्वरीत सामन्यांमधून माघार घ्यावी लागली आहे.   *मिचेल मार्श, रायझिंग पुणे सुपरजायंट्स दुखापतीमुळे IPL मधून आऊट झालेले परदेशी खेळाडू पुण्याचा अष्टपैलू मिचेल मार्शनं बरगड्यांच्या दुखापतीमुळं आयपीएलमधून माघार घेतली.   *स्टीव्हन स्मिथ, रायझिंग पुणे सुपरजायंट्स दुखापतीमुळे IPL मधून आऊट झालेले परदेशी खेळाडू ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथनं यंदा पुण्यासाठी दमदार कामगिरी बजावली होती. पण मनगटाच्या दुखापतीमुळं तो उर्वरीत सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही.   *लसिथ मलिंगा, मुंबई इंडियन्स malinga श्रीलंकेचा लसिथ मलिंगाला गुडघ्याच्या दुखापतीमुळं आशिया चषकात आणि ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात खेळू शकला नव्हता. त्याला आयपीएलमधूनही माघार घ्यावी लागली आहे.   *लेण्डल सिमन्स, मुंबई इंडियन्स दुखापतीमुळे IPL मधून आऊट झालेले परदेशी खेळाडू वेस्ट इंडिजच्या विश्वचषक विजयाचा हीरो लेण्डल सिमन्सच्या पाठीच्या दुखापतीनं उचल खाल्यामुळं त्याला आयपीएलमध्ये केवळ एकाच सामन्यात खेळता आलं.   *शॉन मार्श, किंग्स इलेव्हन पंजाब दुखापतीमुळे IPL मधून आऊट झालेले परदेशी खेळाडू किंग्स इलेव्हन पंजाबचा फलंदाज शॉन मार्श पाठीला झालेल्या दुखापतीमुळं आयपीएलच्या उर्वरीत मोसमात खेळू शकणार नाही.   *सॅम्युअल बद्री, रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर दुखापतीमुळे IPL मधून आऊट झालेले परदेशी खेळाडू कॅरिबियन लेग स्पिनर सॅम्युएल बद्रीला दुखापतीमुळं आयपीएलमधून एकही सामना न खेळता माघार घेतली.   *मिचेल स्टार्क, रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर दुखापतीमुळे IPL मधून आऊट झालेले परदेशी खेळाडू ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला पायाच्या दुखापतीमुळं ट्वेण्टी ट्वेण्टी विश्वचषकातून आणि त्यापाठोपाठ आयपीएलमधूनही माघार घ्यावी लागली.   *जॉन हॅस्टिंग्स, कोलकाता नाईट रायडर्स दुखापतीमुळे IPL मधून आऊट झालेले परदेशी खेळाडू ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जॉन हॅस्टिंग्जचा घोटा दुखावल्यामुळं त्याला मायदेशी परतावं लागलं. हॅस्टिंग्सला शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागणार असून, त्यानंतर सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आलाय.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
Embed widget