एक्स्प्लोर
हैदराबादचा मुंबई इंडियन्सवर सात विकेट्सनी दणदणीत विजय
मुंबई : शिखर धवन आणि मोझेस हेन्रिक्सनं दुसऱ्या विकेटसाठी रचलेल्या 91 धावांच्या भागिदारीनं हैदराबादला आयपीएलच्या सामन्यात मुंबईवर सात विकेट्सनी दणदणीत विजय मिळवून दिला. हैदराबादचा हा तेरा सामन्यांमधला सातवा विजय ठरला.
हैदराबादनं सात विजय आणि एक रद्द सामना यांमधून 15 गुणांची कमाई केली असून, आयपीएलच्या गुणतालिकेत हैदराबाद चौथ्या स्थानावर आहे. अव्वल स्थानावरच्या मुंबईच्या खात्यात बारा सामन्यांमध्ये नऊ विजयांसह 18 गुण आहेत.
मुंबईनं प्ले ऑफचं तिकीट आधीच मिळवलेलं आहे. दरम्यान, आजच्या सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांनी मुंबईला वीस षटकांत सात बाद 138 धावांत रोखून कमाल केली.
हैदराबादच्या सिद्धार्थ कौलनं तीन, तर भुवनेश्वर कुमारनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं. त्यानंतर शिखर धवन आणि मोझेस हेन्रिक्सनं दुसऱ्या विकेटसाठी रचलेल्या 91 धावांच्या भागिदारीनं हैदराबादच्या विजयाचा पाया घातला. हेन्रिक्सनं 35 चेंडूंत 44 धावांची, तर धवननं 46 चेंडूंत नाबाद 62 धावांची खेळी उभारली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement