12 डिसेंबर रोजी गुवाहटीमध्ये सीआयडीच्या छाप्यात 1 कोटी 54 लाखाच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
2/11
याच दिवशी जयपूरमधूनही तब्बल 2 कोटींच्या नव्या नोटा जप्त केल्या गेल्या.
3/11
तीन दिवसांपूर्वी दिल्लीच्या ग्रेटर कैशाल परिसरातील एका लॉ फर्ममधून 13 कोटी 65 लाखाची रोकड मिळाली.
4/11
तर याच दिवशी तमिळनाडूतील वेल्लोरमधून 24 कोटी रुपये जप्त करण्यात आले.
5/11
10 डिसेंबर रोजी कर्नाटकमधील चित्रदुर्गमध्ये 5 कोटी 70 लाखांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या.
6/11
9 डिसेंबर रोजी मुंबई, हैदराबाद, पोरबंदरसह अनेक शहरांतून 2 कोटी रुपये मिळाले.
7/11
8 डिसेंबर रोजी चेन्नईमधील एका खाण माफियाकडून 170 कोटी रुपये जप्त करण्यात आले.
8/11
एकीकडे नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरातील जनता पैशांसाठी तासनतास बँक आणि एटीएम सेंटरबाहेर रांगेत उभे आहेत. त्यामुळे बँक आणि एटीएममध्ये खडखडाट आहे. तर दुसरीकडे काही धनदांडग्यांकडून कोट्यवधीचे घबाड हाती लागत आहे. जयपूर, गोवाहटी आणि रुद्रपूरमधून अनेक ठिकाणांहून नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
9/11
नोटाबंदीपासून गेल्या 15 दिवसात देशभरातून तब्बल 227 कोटीहून जास्त काळा पैसा जप्त करण्यात आला आहे.
10/11
कारण एखाद्या लहान शहरात जवळपास 20 एटीएम सेंटर आहेत. हे कोट्यवधी रुपये 28 शहरातील एटीएममध्ये भरता आले असते. मात्र, यावर धनदांडग्यांनी डल्ला मारल्याने, बँकांमधून वेळीच रोकड उपलब्ध होऊ शकले नाहीत.
11/11
आत्तापर्यंत देशभरातून असे एकूण 227 कोटी जप्त करण्यात आले आहेत. हेच पैसे जर सर्वसामान्यांना वेळीच मिळाले असते, तर अनेकांची सोय झाली असती. जर या 15 दिवसात प्रत्येकी 2000 रुपये बँक किंवा एटीएममधून दिले गेले असते, तर तब्बल 35 हजार नागरिकांना याचा फायदा झाला असता. तसेच नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी देशभरातील 567 एटीएम सेंटरमध्ये 40 लाख रुपये उपलब्ध झाले असते.