एक्स्प्लोर

Fact Check : लोकसभा निवडणूक संपल्यावर ठाकरे आणि शिंदे एकत्र येऊन भाजपमध्ये विलिन होणार का ? वाचा सत्य

Fact Check : लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार अशा पोस्ट केल्या जात होत्या. त्यासंदर्भातील सत्य जाणून घ्या.

CLAIM : लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे आणि शिंदे एकत्र येणार आणि संपूर्ण शिवसेना भाजपसोबत जाणार आहेत.

FACT CHECK : व्हायरल दावा भ्रामक आहे. "उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार आणि संपूर्ण शिवसेना भाजपसोबत जातील," असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले होते.

उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा गट) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट लोकसभा निवडणूक संपल्यावर एकत्र येणार आणि भाजपमध्ये सामील होणार, या दाव्यासह साम टीव्हीच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये केलेले वक्तव्य वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. दोन्ही गट एकत्र आल्याची कोणतीही अधिकृत माहिती नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल स्क्रीनशॉट साम टीव्ही चॅनलचे लोगो आणि ग्राफीक्स दिसते. बातमीमध्ये लिहिले होते की, “लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे आणि शिंदे एकत्र येणार आणि संपूर्ण शिवसेना भाजपसोबत जाणार.”

युजर्स स्क्रीनशॉट शेअर करतान कॅप्शनमध्ये लिहितात की, “उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला मत म्हणजे भाजपला मत त्यामुळे विचारपूर्वक मतदान करा.”

Fact Check : लोकसभा निवडणूक संपल्यावर ठाकरे आणि शिंदे एकत्र येऊन भाजपमध्ये विलिन होणार का ? वाचा सत्य

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह 

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम असा कोणता निर्णय झाला असता तर ही सर्वात बातमी ठरली असती. परंतु, उबाठा आणि शिंदे गट एकत्र येऊन भाजपमध्ये विलिन होणार अशी बातमी कोणत्या माध्यमांवर आढळत नाही.

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल स्क्रीनशॉटमधील वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले होते.

साम टीव्ही चॅनलने 15 मे रोजी आपल्या युट्यूब चॅनलवरून बातमीचा व्हिडिओ अपलोड केला की, लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात वंचित बहुजनचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेला लक्ष्य करत म्हणाले की, निवडणुकीनंतर ठाकरे आणि शिंदे गट एकत्र आले तर आश्चर्य वाटणार नाही.

साम टीव्हीने 14 मे रोजी प्रकाश आंबेडकर यांच्या कल्याणमधील सभेतील भाषण थेट प्रक्षेपण केले होते. 

या भाषणात प्रकाश आंबेडकर 28:12 मिनिटांवर बोलतात की, “एकनाथ शिंदेंसोबत ठाकरेंचा समझोता झाला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर हे दोघे एकत्र आले, तर आश्चर्य वाटायला नको. चर्चा सुरू झाली आहे. आपण एकल असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील म्हणाले होते की, जर उद्धव ठारकेंना काही अडचण आल्यास मी त्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही.”

तसेच ते पुढे सांगतात की, “लोकसभा निवडणूक संपल्यावर ठाकरे भाजपसोबत जाणार म्हणून काँग्रेसनेदेखील उबाठा सेनेपासून फारकत घेतली आहे.”

उबाठा नेते मत

प्रकाश आंबेडकारांनी केलेल्या वक्तव्यवर पत्रकारांनी अंबादास दानवेंना प्रतिक्रीया मागितल्यावर त्यांनी सांगितले की, “आमच्या पक्षातून जे निघून गेले त्यांना पुन्हा शिवसेनेत (उबाठा) प्रवेश मिळणार नाही.”

याआधी अनेकदा उद्धव ठाकरे आणि एकनाथ एकत्र येणार अशा आफवा व्हायरल झाल्या होत्या.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार आणि संपूर्ण शिवसेना भाजपसोबत जातील, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. व्हायरल स्क्रीनशॉट भ्रामक दाव्यासह शेअर केले जात आहे.

[डिस्क्लेमर: ही बातमी पहिल्यांदा Fact Crescendo  वर प्रकाशित झाली होती. एबीपी माझानं 'शक्ती कलेक्टिव्ह' अंतर्गत हे वृत्त प्रकाशित केलं असून मूळ बातमीचा अर्थ बदलेलं असा कोणताही बदल केलेला नाही.]

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीसRohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोलNayana Kadu on Bachchu kadu : पाचव्यांदा बच्चू कडू विजयी होतील- नयना कडूTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Devendra Fadnavis on CM Post: आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Embed widget