Zollywood : ‘झॉलीवूड’मधून झाडीपट्टीची दुनिया मोठ्या पडद्यावर अवतरणार, ‘या’ दिवशी चित्रपट होणार रिलीज!
Zollywood : झाडीपट्टी रंगभूमी हा अतिशय खास कलाप्रकार तर आहेच, पण झाडीपट्टी ही जणू एक इंडस्ट्रीच आहे.
Zollywood : विदर्भात प्रचंड लोकप्रिय असलेल्या झाडीपट्टी या नाटकाच्या खास प्रकारावरची धमाल आत ‘झॉलीवूड’(Zollywood) या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. बऱ्याच आंतररष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला हा चित्रपट नव्या दमाचा दिग्दर्शक तृषांत इंगळेनं दिग्दर्शित केला असून, हा चित्रपट 3 जून रोजी प्रदर्शित होत आहे.
विदर्भात लोकप्रिय असलेल्या झाडीपट्टी नाटकांविषयी उर्वरित महाराष्ट्रात विशेष माहिती नाही. मात्र, झाडीपट्टी रंगभूमी हा अतिशय खास कलाप्रकार तर आहेच, पण झाडीपट्टी ही जणू एक इंडस्ट्रीच आहे. त्यामुळे झॉलीवूडमधून पहिल्यांदाच झाडीपट्टी चित्रपटाच्या रुपात जगभरात पोहोचणार आहे.
कोरोनामुळे अडकले प्रदर्शन
चित्रपट तयार असूनही कोरोना प्रादुर्भावामुळे प्रदर्शित करता येत नव्हता. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येत असल्याचा आनंद आहे. "झॉलीवूड" हा माझा पहिलाच चित्रपट आहे. झाडीपट्टी हा माझ्या हृदयाच्या जवळचा विषय आहे. या विषयाला चित्रपटातून न्याय देऊ शकलो याचं समाधान वाटतं, असं तृषांतनं सांगितलं.
विशबेरी फिल्म्सच्या प्रियंका अगरवाल, अंशुलिका दुबे, शाश्वत सिंग यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून, अमित मसूरकर आणि डयुक्स फार्मिंग फिल्म्स चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. तर ‘न्यूटन’, ‘शेरनी’, ‘सुलेमानी किडा’ असे दर्जेदार चित्रपट दिग्दर्शित केलेले अमित मसूरकर या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आणि प्रस्तुतकर्ते आहेत.
झाडीपट्टी नाटकांतून बालकलाकार म्हणून काम!
चित्रपटाचा दिग्दर्शक तृषांत इंगळेने स्वतः झाडीपट्टी नाटकांतून बालकलाकार म्हणून काम केले आहे. विदर्भात लोकप्रिय असलेल्या झाडीपट्टी नाटकांविषयी उर्वरित महाराष्ट्रात विशेष माहिती नाही. मात्र, झाडीपट्टी रंगभूमी हा अतिशय खास कलाप्रकार तर आहेच, पण झाडीपट्टी ही जणू एक इंडस्ट्रीच आहे. या प्रकारावर पहिल्यांदाच चित्रपट निर्मिती होत आहे. चित्रपटसृष्टीत करिअर करण्याच्या इराद्याने तृषांतने 16व्या वर्षी मुंबई गाठली. त्यानंतर लेखन, कास्टिंग डिरेक्शनचा अनुभव घेत आता ‘झॉलीवूड’ या चित्रपटाच्या रुपाने त्याने पहिला चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ‘झॉलीवूड’ या चित्रपटाला फ्रान्समधील इंडियन फेस्टिव्हल ऑफ तौलौसमध्ये स्पेशल ज्युरी अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आलं आहे.
हेही वाचा :
- Aathva Rang Premacha : सप्तरंगी प्रेमाचा नवा रंग घेऊन येतेय रिंकू राजगुरू, 'आठवा रंग प्रेमाचा' लवकरच होणार प्रदर्शित
- Ranbir-Alia Wedding : ना 14 ना 17 एप्रिल... 'या' दिवशी आलिया-रणबीर घेणार सात फेरे
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha