Zol Zaal Trailer Out: एक-दोन नव्हे तब्बल 22 कलाकारांची धमाल, हास्याचा धुमाकूळ घालत ‘झोलझाल’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित!
Zol Zaal Trailer Out: 'झोलझाल' (Zol Zaal) हा चित्रपट येत्या 1 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटातील हास्याची मेजवानी कशी रंगणार याची झलक नुकतीच चित्रपटाच्या ट्रेलरमधुन पाहायला मिळाली.
Zol Zaal : दोन वर्ष अंधारात काढलेल्या कोरोनाच्या काळ्याकुट्ट काळानंतर सर्वच क्षेत्रांनी जोर धरला आहे. चित्रपटसृष्टी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज झालेली असताना, प्रेक्षकांना मनमुरादपणे हसायला लावण्यास अमोल लक्ष्मण कागणे आणि लक्ष्मण एकनाथ कागणे प्रस्तुत 'युक्ती इंटरनॅशनल प्रॉडक्शन' अंतर्गत आणि 'रोलींगडाईस' असोसिएशन सोबत 'झोलझाल' (Zol Zaal) हा चित्रपट येत्या 1 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटातील हास्याची मेजवानी कशी रंगणार याची झलक नुकतीच चित्रपटाच्या ट्रेलरमधुन पाहायला मिळाली.
या ट्रेलरने चित्रपटाची उत्सुकता अधिक ताणली गेली असून, हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवणार यांत शंकाच नाही. ट्रेलर पाहून कलाकारांनी घातलेला गोंधळ चित्रपटाची उत्सुकता वाढवणारा आहे. ‘झोलझाल’ या चित्रपटात तब्बल 22 कलाकारांनी मिळून काय गोंधळ घातलाय, हे येत्या 1 जुलैला रसिक प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहणे नक्कीच रंजक ठरणार आहे.
पाहा ट्रेलर :
कलाकारांची मांदियाळी
'झोलझाल' चित्रपटात विविधांगी भूमिका साकारलेल्या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळतेय. हास्याची कारंजे घेऊन हे कलाकार रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घ्यायला येत्या 1 जुलैला येत आहेत. या चित्रपटातील गाणी आणि चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर आधीच धुमाकूळ घालत आहे.
या चित्रपटात मंगेश देसाई, मनोज जोशी, अजिंक्य देव, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, अमोल कागणे, ऋतुराज फडके, सयाजी शिंदे, उदय नेने, उदय टिकेकर, अंकुर वाढवे, विश्वजित सोनी, श्याम मसलकर, प्रीतम कागणे, इशा अग्रवाल, अलिशा फरेर, सुप्रिया कर्णिक, प्रियांका खोलगडे, साईशा पाठक हे सिनेकलाकार दिसणार असून, या कलाकारांच्या भूमिका चित्रपटांत निव्वळ पर्वणीच ठरतील यांत शंकाच नाही. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ट्रेलरमधून तुम्हाला कळेल की, ही कलाकारांची मांदियाळी चित्रपटात नेमका काय धिंगाणा घालणार आहेत.
'युक्ती इंटरनॅशनल प्रोडक्शन' अंर्तगत 'झोलझाल' चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीस येत आहे. दिग्दर्शक मानस कुमार दास यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची बाजू पेलवली असून, चित्रपटाची निर्मिती निर्माते गोपाळ अग्रवाल, आनंद गुप्ता, संजना जी अग्रवाल यांनी केली असून सहनिर्माते म्हणून रश्मी अग्रवाल आणि विनय अग्रवाल यांनी बाजू सांभाळली. तर, चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून सारिका गुप्ता आणि स्वप्निल गुप्ता यांनी बाजू सांभाळली. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद मानस कुमार, संजीव सोनी आणि आनंद गुप्ता लिखित आहेत. तर, चित्रपटाच्या संगीताची बाजू प्रफुल-स्वप्नील आणि ललित रामचंद्र यांनी उत्तमरित्या पेलली आहे. अमेय खोपकर हे चित्रपटाचे वितरक आहेत.
दहावीचा बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर असा पाहा निकाल
यंदा तुम्हाला 'ABP Majha' च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी MH10.ABPMajha.Com या लिंकवर क्लिक करा.
संबंधित बातम्या