एक्स्प्लोर

Marathi Serial: Zee Marathi वर ‘दीपज्योती’ची धमाकेदार एन्ट्री; पूर्वा कौशिकचा सोज्वळ अंदाज चर्चेत!

प्रेक्षक ज्योतीला ही तितक्याच आपुलकीने एकसेप्ट करतील जसे माझ्या आधीच्या भूमिकेला केले आहे हीच अपेक्षा आहे.अशी आशा पूर्वाने व्यक्त केली.

Zee Marathi: झी मराठीवरील नव्या मालिकांच्या यादीत आता आणखी एका मालिकेची भर पडणार आहे. '' ही नवी मालिका 13 एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात अभिनेत्री पूर्वा कौशिक ‘ज्योती’ या साध्या, सोज्वळ भूमिकेत दिसणार आहे. आपल्या आधीच्या हटके भूमिकांनंतर पूर्णतः वेगळ्या अवतारात येत असल्याने ही मालिका आणि पूर्वाचा नवा लूक दोन्ही सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. ‘ज्योती’ ही व्यक्तिरेखा साकारताना तिचा अनुभव, तयारी आणि भावना व्यक्त केल्या. 

'शिवा 'नंतर दीपज्योती मालिकेत पूर्वाची एन्ट्री

"झी मराठीवर परत एकदा ‘दीपज्योती’सोबत येते आहे आणि माझ्या भूमिकेचं नाव आहे ‘ज्योती’. माझ्या आधीच्या भूमिकेपेक्षा ही खूप वेगळी भूमिका आहे. ज्योती ही खूप समजूतदार, गुणी, घरगुती आणि साधी, गोड अशी मुलगी आहे. तिला नटण्याची-सजण्याची आवड आहे आणि ती खूप सुंदर दिसते. तिला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे आणि ती आईसोबत राहते. वडीलही आहेत, पण त्यांच्या व्यसनामुळे तिला त्यांच्यावर खूप राग आहे. ज्योतीची ही सोज्वळ भूमिका प्रेक्षकांना नक्की आवडेल.

ती पुढे म्हणाली," आधीही मी झी मराठीवर ‘शिवा’ नावाची भूमिका साकारली होती, जी खूप वेगळी होती आणि सर्वसामान्य मुलींसारखी नव्हती. त्यामुळे मला भीती होती की त्या भूमिकेनंतर मला पुन्हा मुख्य नायिकेची भूमिका मिळेल का. तसेच, पुन्हा एका साध्या मुलीच्या भूमिकेत प्रेक्षक मला स्वीकारतील का, असा प्रश्न मनात होता. पण झी मराठीने माझा हा समज मोडून काढला. त्यामुळे ‘ज्योती’च्या भूमिकेसाठी जेव्हा कॉल आला तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला. तो क्षण शब्दांत सांगणं कठीण आहे."

भूमिकेची तयारी करणं तारेवरची कसरत

" ही भूमिका माझ्या आधीच्या भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. या भूमिकेसाठी तयारी करताना माझ्या मनात सतत माझ्या आधीच्या भूमिकेशी तुलना होत राहते. खऱ्या आयुष्यात माझा स्वभाव थोडा थेट आहे. ‘शिवा’ करताना मला एवढी तयारी करावी लागली नव्हती, जितकी ‘ज्योती’साठी करावी लागत आहे. ज्योती ही खूप समजूतदार, नाजूक आणि सोज्वळ मुलगी आहे. तिचं राहणीमान, वागणं आणि तिचा साधेपणा साकारण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागत आहे. ज्योतीचं बोलणं, वागणं, तिचे हावभाव, तिचं बघणं, राग व्यक्त करण्याची पद्धत, तिचा अबोला आणि तिचा साधेपणा – हे सगळं खूप सूक्ष्म आहे. या सगळ्याची तयारी करणं माझ्यासाठी सध्या तारेवरची कसरत आहे. पण ही भूमिका करताना मला खूप आनंदही मिळतो आहे. मला हळू बोलायचं आहे, शब्दांचा तोल राखायचं आहे आणि वागताना स्वतःला ओव्हर दाखवायचं नाही. साध्या मुलीची भूमिका करणं सोपं वाटत असलं तरी माझ्यासाठी ते आव्हानात्मक आहे. मी खूप मेहनत घेत आहे आणि ती प्रेक्षकांना नक्की दिसेल. 

ज्योतीच्या भूमिकेबद्दल मनात भीती

प्रोमोला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, ज्योतीच्या भूमिकेबद्दल मला थोडी भीती आहे – मी कशी दिसेन आणि प्रेक्षकांना कितपत आवडेन याची. पण मी पूर्ण प्रयत्न करत आहे की प्रेक्षक ज्योतीवरही तितकंच प्रेम करतील. प्रेक्षकांमध्ये या भूमिकेबद्दल उत्सुकता आहे, याचा मला आनंद आहे. आम्ही सर्वजण पहिल्यांदा भेटलो तेव्हा एपिसोडचं वाचन होतं. तेव्हाच सगळ्यांची ओळख झाली. माझ्या बहिणींच्या भूमिका करणाऱ्या मानसी आणि सलोनी खूप छान आहेत. शूटिंगच्या पहिल्याच दिवशी असं वाटलं की आपण खूप दिवसांपासून एकत्र काम करत आहोत. संपूर्ण टीम पहिल्याच दिवशी खूप छान मिसळून गेली.”

  प्रेक्षक ज्योतीला ही तितक्याच आपुलकीने एकसेप्ट करतील जसे माझ्या आधीच्या भूमिकेला केले आहे हीच अपेक्षा आहे. 'दीपज्योती' तुमच्या भेटीला येत आहे १३ एप्रिलपासून । दररोज रात्री ८ वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.

महत्त्वाच्या बातम्या

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, तिन्ही आरोपी सज्ञान, बिश्नोई गँगच्या ऑडिओबद्दलही पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, तिन्ही आरोपी सज्ञान, बिश्नोई गँगच्या ऑडिओबद्दलही पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
Tiger Shroff Mother Reaction: टायगरवर हल्ला करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या, एक आरोपी तर Rapido रायडर; लेकासाठी आईची 3 शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाल्या...
टायगरवर हल्ला करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या, एक आरोपी तर Rapido रायडर; लेकासाठी आईची 3 शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाल्या...
Tiger Shroff Car Firing Live Updates: टायगर श्रॉफवर हल्ला, आता काय काय घडतंय?, LIVE अपडेट्स, एका क्लिकवर
Tiger Shroff Car Firing Live Updates: टायगर श्रॉफवर हल्ला, आता काय काय घडतंय?, LIVE अपडेट्स, एका क्लिकवर
Tiger Shroff Car Attack: टायगर श्रॉफ हल्लाप्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारतींच्या पोस्टने खळबळ, श्रेयवादावरुन नाराजी, नेमकं काय घडलं?
टायगर श्रॉफ हल्लाप्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारतींच्या पोस्टने खळबळ, श्रेयवादावरुन नाराजी, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election Result: कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव, मुलगाही पडला; मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, सांगितलं परभवाचं राज'कारण'
'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव, मुलगाही पडला; मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, सांगितलं परभवाचं राज'कारण'
JIO IPO : जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, 8110 कोटींसाठी अडीच लाख कोटींची बोली, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
“दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल''; फडणवीसांची मश्किल टिपण्णी
“दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल''; फडणवीसांची मश्किल टिपण्णी
Gokul Election Result Live: गोकुळच्या निवडणुकीत उलटफेर सुरुच, आता महायुतीचा उमेदवार फेरमतमोजणीत विजयी, एक जागा वाढली
Gokul Election Result Live: गोकुळच्या निवडणुकीत उलटफेर सुरुच, आता महायुतीचा उमेदवार फेरमतमोजणीत विजयी, एक जागा वाढली
Gokul Election Result LIVE: सतेज पाटलांनी एकहाती गोकुळ खेचलं; तीन कॅबिनेट मंत्री, दोन खासदार, अन् 10 आमदारांना एकाचवेळी धोबीपछाड देत महायुतीला धोबीपछाड
Gokul Election Result LIVE: सतेज पाटलांनी एकहाती गोकुळ खेचलं; तीन कॅबिनेट मंत्री, दोन खासदार, अन् 10 आमदारांना एकाचवेळी धोबीपछाड देत महायुतीला धोबीपछाड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2026 | सोमवार
Embed widget