एक्स्प्लोर

Zakir Khan shocking decision: कॉमेडियन झाकिर खानचा धक्कादायक निर्णय, पाच वर्षांचा ब्रेक घेणार, प्रकृतीची गंभीर समस्या? नेमकं काय म्हणाला?

Zakir Khan shocking decision: पुढील तीन ते पाच वर्षे, म्हणजेच 2028-29 किंवा 2030 पर्यंत ते स्टेज शोमधून विश्रांती घेणार आहे.

मुंबई : प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन झाकिर खान याने कॉमेडी कार्यक्रमांमधून दीर्घ काळासाठी ब्रेक घेण्याची घोषणा केली आहे. सातत्याने सुरू असलेल्या दौऱ्यांमुळे आणि कामाच्या ताणामुळे प्रकृती बिघडत असल्याने हा निर्णय घेतल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.(Zakir Khan shocking decision) सध्या ‘पापा यार’ या स्टँड-अप स्पेशलसाठी देश-विदेशात दौरे करणारे झाकिर खान याने हैदराबादमधील एका शोदरम्यान आपल्या आगामी प्लॅनची माहिती दिली. या वेळी त्याने सांगितले की, पुढील तीन ते पाच वर्षे, म्हणजेच 2028-29 किंवा 2030 पर्यंत ते स्टेज शोमधून विश्रांती घेणार आहे. या काळात आरोग्याकडे लक्ष देणे आणि वैयक्तिक बाबी सांभाळणे, हा ब्रेक घेण्यामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

20 जूनपर्यंतचे सर्व शो विशेष

दरम्यान, झाकिर खान याने सोशल मीडियावरही या निर्णयाचे संकेत दिले आहेत. इंस्टाग्राम स्टोरीद्वारे त्याने 20 जूनपर्यंतचे सर्व शो विशेष असल्याचे नमूद करत, त्या तारखेला आपला शेवटचा शो होणार असल्याचे सूचित केले होते. झाकिर खान गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ सलग काम करत आहे. सततचे प्रवास, दिवसाला दोन-तीन शो, अपुरी झोप आणि अनियमित दिनचर्या याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचे त्याने यापूर्वीही मान्य केले होते. याच पार्श्वभूमीवर त्याने आता कॉमेडीमधून दीर्घ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

उशीर होण्यापूर्वी थांबणे गरजेचे वाटले

सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, चाहत्यांशी संवाद साधताना झाकीर खान याने सांगितले की, गेल्या वर्षभरापासून त्याची तब्येत ठीक नाही. सततचा प्रवास, सलग शो, अनियमित झोप आणि लाईव्ह परफॉर्मन्समधील शारीरिक ताण याचा त्याच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. बराच काळ त्याने या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याची कबुली देत, “उशीर होण्यापूर्वी थांबणे गरजेचे वाटले,” असेही त्याने नमूद केले आहे.

झाकीर खान तात्काळ मंचापासून दूर जाणार नसून, सध्या सुरू असलेला ‘पापा यार’ टूरसह काही निवडक कार्यक्रम ते पूर्ण करणार आहेत. मात्र, ही बांधिलकी संपल्यानंतर तो स्टेज परफॉर्मन्सपासून दीर्घ काळासाठी ब्रेक घेणार असून, या काळात पूर्णपणे आरोग्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. हा निर्णय निवृत्तीचा संकेत नसल्याचे झाकीर खान याने स्पष्ट केले आहे. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ अखंडपणे काम केल्यानंतर आयुष्यात समतोल साधण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्याने सांगितले. त्याच्या या निर्णयाचे चाहत्यांसह अनेक कलाकारांनी स्वागत केले असून, प्रामाणिकपणाबद्दल कौतुक करत आरोग्याला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला आहे.
झाकीर खानची ही घोषणा यशस्वी कारकीर्दीतही थांबणे गरजेचे असते, याची जाणीव करून देणारी ठरत असून, हा ब्रेक शेवट नव्हे तर नव्या सुरुवातीसाठी आवश्यक असलेला ‘रीसेट’ असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Troll Tikka (@trolltikka)

महत्त्वाच्या बातम्या

Satluj: रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
Dashmi Marathi Movie Poster: महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
OTT Webseries: 7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget