"माझ्या आईने दिलेल्या स्वातंत्र्यामुळे...", आईच्या आठवणीत प्रसिद्ध TV अभिनेत्री भावूक; पालकांबद्दल नेमकी काय म्हणाली?
TV Actress Yogita Chavan Shares Emotional Memories of Her Mother: 'तू अनोळखी तरी सोबती' या मालिकेतून योगिता चव्हाण प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या नव्या मालिकेच्या प्रोमोशनवेळी तिने तिच्या आईच्या आठवणींना उजाळा दिला.

TV Actress Yogita Chavan: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री योगिता चव्हाण लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. झी मराठी वाहिनीवरील 'जीव माझा गुंतला' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली होती. ती सध्या नव्या मालिकेमुळे चर्चेत आहे. सन मराठी वाहिनीवरील 'तू अनोळखी तरी सोबती' या मालिकेतून ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या प्रोमोशनवेळी योगिता भावनिक झाली होती. तिनं आईसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. तिनं आपल्या आईबद्दल सांगितलं. तिच्या आयुष्यात सर्वांत मोठी सपोर्ट आई होती, असं योगिता म्हणाली. आईबाबत बोलताना योगिता भावनिक झाली होती.
आईच्या आठवणींना उजाळा देताना योगिता भावूक
मराठी फ्लॅशशी संवाद साधताना योगिता म्हणाली, "आई माझी खूप चांगली होती. ती या जगात नाही. पण ती माझा सगळ्यात मोठी सपोर्ट होती. जेव्हा आयुष्यात मी काहीच नव्हते, तेव्हा तिला माझ्याबद्दल कौतुक वाटायचं, मी किती छान नाचते.. असं आई म्हणायची. तिला माझं खूप कौतुक होतं. मला माझ्या आईचा पाठिंबा होता. तिनं मला दिलेल्या स्वातंत्र्यामुळे मला माझी स्वप्न पूर्ण करता आली. माझ्या लहानपणीच्या आठवणींमध्ये कोणतीही कटू आठवण नाही. माझ्या पालकांबाबत कोणती तक्रार सुद्धा नाही. माझी आई खूप गोड होती. जाताना देखील मला ती ताकद देऊन गेली", असं योगिता आपल्या आईच्या आठवणींमध्ये म्हणाली.
View this post on Instagram
"आता मला कळतंय की माझी आई किती खंबीर होती. तिनं आयुष्यात खूप गोष्टी सहन केल्या आहेत. तिनं जेवढं केलंय, त्याचं निमं जरी करू शकले तरी मला खूप मोठं काहीतरी जिंकल्यासारखं वाटेल", असं योगिता म्हणाली. तिनं प्रोमोशनच्या कार्यक्रमातून आईच्या आठवणींना उजाळा दिला. योगिता लवकरच "तू अनोळखी तरी सोबती" या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका सन मराठी वाहिनीवर 5 जानेवारी 2026 पासून सुरू होणार आहे. या मालिकेत योगिता चव्हाण प्रमुख भूमिकेत असून, अंबर गणपुळे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
























