स्मृती मानधनाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छाल नेमका आहे तरी कोण? दोघांच्या वयात किती अंतर?
Who Is Smriti Mandhanas Boyfriend? 27 वर्षांची क्रिकेटर स्मृती मानधना आणि 29 वर्षांचा पलाश मुच्छाल एकमेकांना डेट करत आहेत. पण, तो काय करतो माहितीय का तुम्हाला?
Who Is Smriti Mandhanas Boyfriend? भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू स्मृती मानधना म्हणजे, अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत. स्मृती महिला वनडेत सर्वाधिक शतकं झळकावणारी भारताची पहिली फलंदाज ठरली आहे. स्मृतीचे षटकार, चौकार जेवढे सुरेख असतात, तितकीच ती दिसतेही सुंदर. केवळ भारतातच नाहीतर, संपूर्ण जगभरात स्मृतीचे फॅन्स आहेत. तिच्या सोशल मीडिया हॅडल्सवर चाहत्यांकडून नेहमीच लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जातो. पण, स्मृतीच्या लाखो चाहत्यांचं हार्टब्रेक तेव्हा झालं, ज्यावेळी तिच्या बॉयफ्रेंडबाबत त्यांना कळालं. सध्या चाहते तिच्या बॉयफ्रेंडबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. स्मृतीच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे, पलाश मुच्छाल. तेव्हापासूनच ताहत्यांच्या मनात अनेक प्रश्नांचं काहूर माजलं आहे. पलाश नेमका आहे कोण? तो काय करतो? असे असंख्य प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.
27 वर्षांची क्रिकेटर स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि 29 वर्षांचा पलाश मुच्छाल (Palash Muchhal) एकमेकांना डेट करत आहेत. पलाश मुच्छाल भारतीय संगीतकार आणि फिल्म प्रोड्युसर आहे. आतापर्यंत पलाशनं अनेक गाणी संगीतबद्ध केली आहेत. दोघांच्या वयात दोन वर्षांचं अंतर आहे. तर, पलाशची मोठी बहीण पलक मुच्छाल (Palak Muchhal) बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका आहे. सलमान खानपासून ते हृतिक रोशनपर्यंतच्या चित्रपटांमधील अनेक प्रसिद्ध गाणी पलकनं गायली आहेत. पलाशच्या नेटवर्थबाबत बोलायचं झालं तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची एकूण संपत्ती 20 ते 41 कोटी रुपयांची असल्याचं बोललं जात आहे.
View this post on Instagram
पलाश उत्तम संगीतकार आहेच, पण त्यासोबतच तो एक उत्तम दिग्दर्शकही आहे. 2024 मध्ये, त्याचा चित्रपट काम चलू है OTT वर प्रदर्शित झालेला. ज्यामध्ये राजपाल यादव आणि जिया मानेक मुख्य भूमिकांमध्ये दिसले होते. ZEE5 वरही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता.
दरम्यान, स्मती मानधनाबद्दल सांगायचं झालं तर, मंगळवारी अहमदाबाद येथे झालेल्या मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारतीय महिला संघानं न्यूझीलंड महिला संघाचा 6 गडी राखून पराभव करून मालिका 2-1 अशी जिंकली होती. स्मृती मानधनानं या सामन्यात भारतासाठी शतक झळकावलं आणि यासाठी तिची सामनावीर म्हणून निवड झाली. दरम्यान, हे तिचं ODI मधील 8 वं शतक होतं आणि यामुळे तिच्या नावावर एक मोठा विक्रम झाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :