मी Demisexual आहे... प्रसिद्ध अभिनेत्रीचा लैंगिकतेबाबत मोठा खुलासा; डेमिसेक्सुअल म्हणजे नेमकं काय?
What is Meaning of Demisexual : मानसशास्त्रज्ञांच्या मते, बहुतेक रिलेशनशिपमध्ये शारीरिक किंवा लैंगिक आकर्षण प्राथमिक असल्याचं पाहायला मिळतं.
Famous Singer is Demisexual : प्रसिद्ध गायिकेने तिच्या लैंगिकतेबाबत मोठा खुलासा केला आहे. यानंतर तिच्या चाहत्यांसोबतच सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय बनला आहे. प्रसिद्ध ब्रिटीश गायिका, गीतकार आणि अभिनेत्री तुलीसा कॉन्टोस्टॅवलोस (Tstulisa Contostavlos) हिने अलिकडेच तिच्या लिंगवैशिष्टटेबाबत मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री तुलीसा कॉन्टोस्टॅवलोस हिने सांगितलं की, डेमिसेक्सुअल आहे.
प्रसिद्ध अभिनेत्रीचा लैंगिकतेबाबत मोठा खुलासा
अभिनेत्री तुलिसा कॉन्टोस्टाव्हलोसने अलीकडेच खुलासा केला आहे की, ती डेमिसेक्सुअल आहे आणि यामुळे ती अजूनपर्यंत अविवाहित आहे. आता अभिनेत्रीच्या या खुलाशानंतर या विषयाची जोरदार चर्चा रंगली आहे. डेमिसेक्सुअल किंवा डेमिसेक्सुअली म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न बहुतेक लोकांच्या मनात प्रश्न आहे. तुमच्याही मनात हा प्रश्न असेल तर याचं उत्तर जाणून घ्या.
डेमिसेक्सुअल म्हणजे काय? ( What is Demisexuality )
याबाबत साइकोलॉजिस्टने सांगितलं की, 'डेमिसेक्सुअल म्हणजे अशी व्यक्ती, जी दुसऱ्या व्यक्तीकडे लैंगिक किंवा शारीरिकदृष्ट्या आकर्षित होण्यापूर्वी त्याच्याशी मजबूत भावनिक बंध निर्माण करणं योग्य असल्याचं मानते. काऊंसिलिंग साइकोलॉजिस्ट प्रिया परुळेकर यांनी इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना यासंबंधित माहिती दिली आहे. याचा अर्थ, जे लोक कधीही प्रेम भावना अनुभवता न करता एखाद्याकडे लैंगिकरित्या आकर्षित होत नाहीत, अशा व्यक्तींना डेमिसेक्सुअल म्हणतात. सोप्या भाषेत याचा अर्थ, डेमिसेक्सुअल म्हणजे अशी व्यक्ती जी भावनिक संबंधांशिवाय लैंगिक संबंधासाठी आकर्षित होत नाही.
मानसशास्त्रज्ञांनी सांगितलं की, बहुतेक रिलेशनशिपमध्ये शारीरिक किंवा लैंगिक आकर्षण हे प्राथमिक असते. म्हणजेच, एखाद्याला पाहिल्यानंतर लोक प्रथम शारीरिकदृष्ट्या संबंधित व्यक्तीकडे आकर्षित होतात आणि नंतर हळूहळू त्यांच्यामध्ये भावनिक बंध जुळू लागतात, पण डेमिसेक्सुअल लोकांमध्ये असं होत नाही. त्यांचे भावनिक बंध आधी जुळणं गरजेचं असतं.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :