एक्स्प्लोर

Well Done Aai Upcoming Marathi Movie: प्रेमळ पण कणखर आईची कहाणी सांगणाऱ्या 'वेल डन आई' सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित; विशाखा सुभेदार मुख्य भूमिकेत

Well Done Aai Upcoming Marathi Movie: 'वेल डन आई' चित्रपटाची प्रस्तुती दीपाली प्रोडक्शनने केली असून, निर्मिती सुधीर पाटील यांनी केली आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन शंकर अर्चना बापू धुलगुडे यांनी केले आहे.

Well Done Aai Upcoming Marathi Movie: 'स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी...' हे आपण सर्वजण बालपणापासूनच ऐकत आलो आहोत. आजवर अनेक लेखक-कवींनी लेख-कवनांद्वारे आपापल्या परीनं आईची महती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही अद्याप कोणाला आईरूपी दैवताला शब्दांत गुंफणं नीटसं जमलेलं नाही. निर्माता-दिग्दर्शकांनीही चित्रपटांद्वारे आईचे विविध पैलू उलगडण्याचं काम केलं आहे. 'वेल डन आई' हा आगामी मराठी चित्रपटही आईला केंद्रस्थानी ठेवून बनवण्यात आला आहे. काळ बदलला तरी आई आणि आईची ममता तसूभरही बदललेली नाही. अशाच एका प्रेमळ पण कणखर आईची कहाणी सांगणाऱ्या 'वेल डन आई' या विनोदी मराठी चित्रपटाचे आकर्षक पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हा चित्रपट  14  नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

'वेल डन आई' चित्रपटाची प्रस्तुती दीपाली प्रोडक्शनने केली असून, निर्मिती सुधीर पाटील यांनी केली आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन शंकर अर्चना बापू धुलगुडे यांनी केले आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संदीप गचांडे आणि शंकर धुलगुडे यांनी लिहिले आहेत. घोषणा झाल्यापासून हा चित्रपट शीर्षक भूमिकेत असलेल्या कॅामेडी क्वीन विशाखा सुभेदारमुळे चर्चेत आहे. महाराष्ट्राच्या घरोघरी लोकप्रिय असलेल्या विशाखाने या चित्रपटात साकारलेली आई पाहण्यासाठी रसिक उत्सुक झाले आहे. त्यात भर टाकण्यासाठी 'वेल डन आई' चित्रपटाचे आकर्षक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. 

पोस्टरवर आईच्या भूमिकेत आपली व्यक्तिरेखा एन्जॅाय करणारी विशाखा लक्ष वेधून घेते. जणू रसिकांना थम्स-अप करत ती सिनेमा पाहण्यासाठी आमंत्रितच करत आहे. तिच्या एका बाजूला विजय निकम तर दुसऱ्या बाजूला जयवंत वाडकर आहेत. याखेरीज आयुष पाटील, सिमरन खेडकर, बीना सिद्धार्थ, तन्वी धुरी, विपुल खंडाळे आदी कलाकारांपैकी काही कलाकारांचे चेहरे पोस्टरवर पाहायला मिळतात. या चित्रपटातील आई आजच्या काळातील असल्याचे पोस्टर पाहिल्यावर जाणवते. मध्यमवर्गीय कुटुंबातील ही आई आपल्या मुलासाठी आणि त्याच्या सुखासाठी काय-काय करते ते 'वेल डन आई'मध्ये पाहायला मिळणार आहे. 

याबाबत शंकर अर्चना बापू धुलगुडे म्हणाले की, 'वेल डन आई'मधील आई रसिकांना आजवर कधीही चित्रपटात पाहायला मिळालेली नाही. या चित्रपटाची पटकथा रसिकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी असून, यातील आई परिपूर्ण मनोरंजन करणारी आहे. गीत-संगीत आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांच्या आधारे या चित्रपटाच्या रूपात मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज प्रेक्षकांसमोर सादर करण्याचे काम 'वेल डन आई'च्या टिमने यशस्वीपणे केले असल्याचेही ते म्हणाले. 

गीतकार संदीप गचांडे यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार निशाद गोलांबरे यांनी संगीतसाज चढवला आहे. छायांकन रंजीत साहू यांनी केले असून संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. राज्यपाल सिंह यांनी कार्यकारी निर्मात्याची भूमिका चोख बजावली असून काफिल अन्सारी यांनी प्रोडक्शन हेड म्हणून काम पाहिले आहे. सिनेपोलीस या चित्रपटाचे वितरण करणार आहे. ऍग्नेल रोमन यांनी पार्श्वसंगीत, तर देवेंद्र तावडे यांनी कलादिग्दर्शन केले आहे. चिनी चेतन यांनी नृत्य दिग्दर्शन केले असून, मयुरी बस्तावडेकर यांनी केशभूषा केली आहे. वेशभूषा प्रतिभा गायकवाड यांनी केली असून, रंगभूषा  माधव म्हापणकर यांची आहे. मानस रेडकर या चित्रपटाचे सह दिग्दर्शक असून, आय फोकस स्टुडिओ (विजय दिनेश) यांनी पोस्ट प्रोडक्शन केले आहे. प्रेमांकुर बोस यांनी विज्युअल प्रमोशनचे महत्त्वपूर्ण काम केले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Navi Mumbai Election Result : गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
Shilpa Keluskar : शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
Chhatrapati Sambhajinagar: छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
अमरावतीमध्ये भाजपला दोन धक्के, देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbai Election Result : गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
Shilpa Keluskar : शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
Chhatrapati Sambhajinagar: छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
अमरावतीमध्ये भाजपला दोन धक्के, देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
Chhatrapati Sambhajinagar: लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबई महानगरपालिकेतील सर्व विजयी उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबईतील सर्व विजयी उमेदवारांची यादी
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
Embed widget