Web Series : रॉकेट बॉईज ते बेस्ट सेलर; फेब्रुवारी महिन्यात या सीरिज होणार रिलीज
कोण कोणत्या सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत ते पाहूयात...
Upcoming Web Series In February : ओटीटीवरील वेब सीरिजला (Web Series) प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. वेगवेगळ्या विषयांवरील वेब सीरिज लोक आवडीने पाहतात. फेब्रुवारी महिन्यात काही आगामी वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. कोण कोणत्या सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत ते पाहूयात...
स्नो ड्रॉप (Snowdrop)
ओटीटीवरील कोरियन वेब सीरीज प्रेक्षक आवडीनं पाहतात. स्नो ड्रॉप या कोरियन वेब सीरिजचा पहिलाल एपिसोड हा डिज्नी प्लस हॉटस्टारवर 9 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.
रक्तांचल-2 (Raktanchal-2)
रक्तांचल या वेब सीरिजच दुसरा सिझन एमएक्स प्लेयर या ओटीटी प्लेटफॉर्मवर 11 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता.
मिथ्या (Mithya)
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरेशीची प्रमुख भूमिका असलेली मिथ्या ही सीरिज 18 फेब्रुवारी रोजी झी-5 या ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या हुमाच्या महाराणी या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
बेस्ट सेलर (Bestseller)
बेस्ट सेलर ही वेब सीरिज 18 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये अभिनेत्री श्रुती हासन आणि अभिनेता मिथुन चक्रवर्ती हे भूमिका साकारणार आहेत.
Yahan kitaab aur kirdar dono ki hai apni hi kahani 📖✒️⏳#BestsellerOnPrime,newseries,Feb 18
— shruti haasan (@shrutihaasan) January 28, 2022
@PrimeVideoIN @AlchemyFilms @shrutihaasan #MithunChakraborty @GAUAHAR_KHAN @ArjanTalkin @satyajeet_dubey @meSonalee @sidpmalhotra @sapnasmalhotra @mukulabhyankar @Sam_arria pic.twitter.com/CoRDFFllc3
रॉकेट बॉईज (Rocket Boys)
रॉकेट बॉईज ही सीरिज 4 फेब्रुवारी रोजी सोनी-लिव्हवर रिलीज होईल. ही एक बायोपिक वेब सीरिज आहे. या सीरिजचे कथानक भारतीय अंतराळ संशोधक आणि शास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा आणि डॉ. विक्रम साराभाई यांच्या जीवनावर आधारित आहे.
View this post on Instagram
संबंधित बातम्या
Gangubai Kathiawadi: 'आ रही है गंगू'; बहुचर्चित गंगूबाई काठियावाडीचं नवा पोस्टर प्रदर्शित
Sunil Grover Heart Surgery : अभिनेता सुनील ग्रोव्हरवर हृदय शस्त्रक्रिया, कॉमेडियनची प्रकृती स्थिर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha