एक्स्प्लोर

Waterfront Indie Film Festival 2025: ...म्हणून 'व्हेंटिलेटर’ लिहायला मला 48 वर्ष लागली; मराठी दिग्दर्शकानं सांगितला सुपरहिट सिनेमाबाबतचा 'तो' किस्सा

Waterfront Indie Film Festival 2025: वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक नवनवीन गोष्टींवर चर्चा होताना पाहायला मिळतेय, तर सोबतीला स्वतंत्र दिग्दर्शक कबीर खुराना यांनी क्युरेट केलेल्या शॉर्ट फिल्म विभागाला उत्तम प्रतिसाद देखील मिळाला.

Waterfront Indie Film Festival 2025: वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलचा (WIFF) उद्घाटन सोहळा 2 ऑक्टोबरला अगदी मोठ्या दिमाखात पार पडला. ज्यामध्ये सिनेरसिक, इंडस्ट्रीतील जाणकार आणि स्वतंत्र फिल्ममेकर मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. या फेस्टिव्हलमध्ये शॉर्ट फिल्म स्क्रिनिंग, मास्टरक्लासेस आणि पॅनेल डिस्कशन्स अशा विविध उपक्रमांचा समावेश असणार असून 2 ते 6 ऑक्टोबर 2025 मध्ये हा खास फिल्म फेस्टीवल चित्रपटप्रेमींसाठी पर्वणी ठरतोय. 

वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक नवनवीन गोष्टींवर चर्चा होताना पाहायला मिळतेय, तर सोबतीला स्वतंत्र दिग्दर्शक कबीर खुराना यांनी क्युरेट केलेल्या शॉर्ट फिल्म विभागाला उत्तम प्रतिसाद देखील मिळाला. या निमित्तानं कबीर खुराना म्हणाले की, "वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हल हे नवोदित प्रतिभांना आपलं काम सादर करण्याचं आणि इंडस्ट्री प्रोफेशनल्सशी संवाद साधण्याचं उत्तम  व्यासपीठ आहे" शॉर्ट फिल्म स्क्रिनिंगनंतर प्रेक्षकांनी देखील फिल्ममेकरशी संवाद साधत प्रश्नोत्तरांचा आनंद घेतला.

दिग्दर्शक राजेश मापुसकर आणि अभिनेत्री-साहित्यिक सुचित्रा कृष्णमूर्ती यांचा मास्टरक्लास फेस्टिव्हलमधील एक विशेष आकर्षण ठरलं. दिग्दर्शक राजेश 'व्हेंटिलेटर' लिहायला मला 48 वर्ष लागली, असं सांगत चित्रपटाची मागची खास गोष्ट देखील या निमित्तानं सांगितली.

याबद्दल बोलताना दिग्दर्शक राजेश मापुस्कर म्हणाले की, "व्हेंटिलेटर हा चित्रपट लिहायला मला 48 वर्ष लागली, हा चित्रपट माझ्या चित्रपट प्रवासातला एक खूप महत्वपूर्ण चित्रपट आहे. कारण एका जॉइंट फॅमिलीमध्ये राहून या चित्रपटाची कथा सूचन आणि हा चित्रपट करणं या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी खास होत्या. जॉइंट फॅमिली असल्यानं घरात कायम अनेक माणस असल्यामुळे लोकांचं निरीक्षण करणं, त्यांच्याशी जुळवून घेणं याची त्यांचा सोबत गप्पा मारणे आणि यातून या चित्रपटाची कथा सुचत गेली आणि तब्बल 48 वर्ष हा चित्रपट लिहिण्यासाठी लागली. माझ्या घराची ही गोष्ट असली, तरी यातला प्रत्येक अनुभव या चित्रपटातून प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न केला होता आणि यातून 'व्हेंटिलेटर' कथानकात उतरला."

"माझ्यासारख्या  आपल्या सगळ्यांचा घरी घडणाऱ्या घटना यातून आम्ही दाखवल्या होत्या आणि 48 वर्षांनी ही कुटुंबामधली गंमत , त्यांचा भावना या चित्रपटद्वारे आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलो. राजेश मापुसकर यांचा नुकताच निर्मिती असलेला 'एप्रिल मे 99'नं देखील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि येणाऱ्या काळात ते अनेक वैविध्यपूर्ण कथा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार असल्याचं त्यांनी सांगितलं...", असं दिग्दर्शक राजेश मापुस्कर म्हणाले. 

तर अभिनेत्री गायिका सुचित्रा कृष्णमूर्ती म्हणाल्या की, त्यांनी एका वेगळ्या विषयावर चर्चा साधत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं त्या चर्चेत संवाद साधताना  म्हणाल्या की, "नेपोटिझमवरील वाद हास्यास्पद आहे, आज ही एक लोभी संस्कृती झाली आहे, जिथे लोक इतरांच्या कुटुंबीय पार्श्वभूमी किंवा विशेषाधिकारामुळे झालेल्या यशावर चिडतात..."

या फेस्टिवलमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेता सुजय डहाकेचा मराठी चित्रपट 'श्यामची आई'चं स्क्रिनिंग पार पडलं. सोबतीला सिने रसिकांसाठी खरी पर्वणी ठरली ती म्हणजे, दिग्दर्शक हंसल मेहता, तुषार हीरानंदानी, रोहन सिप्पी आणि विशाल फुरिया यांच्यासोबतच पॅनेल डिस्कशन. ओटीटी, चित्रपट  माध्यमावर चर्चा साधून  त्यांनी इंडस्ट्रीवरील आपली मतं आणि स्वतंत्र फिल्ममेकरच्या भूमिकेवर विचार यातून प्रेक्षकांसमोर मांडलं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Embed widget