![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Indian Police Force : रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’मध्ये विवेक ऑबेरॉयची एन्ट्री; शेअर केली पोस्ट
Indian Police Force : आता रोहितच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’ मध्ये एका अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे.
![Indian Police Force : रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’मध्ये विवेक ऑबेरॉयची एन्ट्री; शेअर केली पोस्ट vivek oberoi join rohit shetty indian police force after sidharth malhotra shilpa shetty Indian Police Force : रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’मध्ये विवेक ऑबेरॉयची एन्ट्री; शेअर केली पोस्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/26/3e6d691408c5a4aa487cda8f87cf70f6_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Indian Police Force : बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीची (Rohit Shetty) ‘इंडियन पोलीस फोर्स’ (Indian Police Force) ही बेस सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हे पोलीस अधिकारी ही भूमिका साकारणार आहेत. आता रोहितच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’ मध्ये आणखी एका अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे.
अभिनेता विवेक ओबेरॉय (vivek oberoi) हा देखील ‘इंडियन पोलीस फोर्स’ मध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहे. त्यानं नुकतीच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत या सीरिजबद्दल माहिती दिली. विवेकनं एका फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्या हातात बंदूक देखील दिसत आहे. हा फोटो शेअर करून विवेकनं त्याला कॅप्शन दिलं, 'रोहित शेट्टी माझ्या भावा, मला ही अप्रतिम भूमिका साकारण्याची संधी दिलीस त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. '
View this post on Instagram
विवेकच्या या पोस्टला रितेश देशमुख आणि शिल्पा शेट्टी यांनी कमेंट करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित शेट्टीच्या सिंघम, सिम्बा आणि सूर्यवंशी या हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. आता त्यांच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)