‘Visfot’ trailer : नात्यांचा 'विस्फोट' होणार की..., रितेश देशमुख-प्रिया बापट एकत्र; मराठीत नाही तर बॉलीवुडमध्ये झळकली जोडी
‘Visfot’ trailer : प्रिया बापट आणि रितेश देशमुख ही मराठमोळी जोडी आता बॉलीवुडमध्ये एका वेगळ्या अंदाजत झळकणार आहे.
![‘Visfot’ trailer : नात्यांचा 'विस्फोट' होणार की..., रितेश देशमुख-प्रिया बापट एकत्र; मराठीत नाही तर बॉलीवुडमध्ये झळकली जोडी ‘Visfot’ trailer Tempers run high in crime thriller starring Riteish Deshmukh and Priya Bapat ‘Visfot’ trailer : नात्यांचा 'विस्फोट' होणार की..., रितेश देशमुख-प्रिया बापट एकत्र; मराठीत नाही तर बॉलीवुडमध्ये झळकली जोडी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/02/fab02148f3beb4194a8bd8b0a7cb027d1725293527566720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
‘Visfot’ trailer : अभिनेता रितेश देशमुखच्या (Ritiesh Deshmukh) 'लयं भारी' या सिनेमामुळे त्याचा मराठीमध्ये एक मोठा चाहतावर्ग तयार झाला. याआधी हिंदीत काम केलेल्या रितेशने मराठीतही आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्याचा नुकताच आलेला वेड हा सिनेमाही प्रेक्षकांना वेड लावून गेला. मराठी आणि हिंदी या दोन्ही माध्यमांमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारा रितेश आता पुन्हा एकदा एका वेगळ्या अंदाज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे त्याच्यासोबत अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) ही देखील झळकणार आहे.
नुकताच रितेश आणि प्रियाच्या विस्फोट या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. ओटीटीवर हा सिनेमा प्रदर्शित होणार असून यामध्ये अनेक मराठी कलाकार देखील दिसणार आहे. त्यामुळे एका मराठमोळ्या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री ही आता बॉलीवूडमध्ये पाहायला मिळणार आहे.
काय आहे सिनेमाची कथा?
दरम्यान विस्फोट हा सिनेमा येत्या 6 सप्टेंबर रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. क्राईम थ्रिलर असा हा सिनेमा आहे. प्रेमात झालेला विश्वासघात आणि चुकीचा मार्ग निवडल्यावर आयुष्यात या होऊ शकतं, असं सगळं या सिनेमा दाखवण्यात आलं आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये प्रियाचा बोल्ड अंदाजही पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे दोन कुटुंबाची ही गोष्ट आहे. प्रिया आणि रितेश हे दोघेही नवरा बायको या सिनेमात दाखवले आहेत. पण प्रिया रितेशची फसवणुक करत असल्याचं या सिनेमात पाहायला मिळतं. प्रिया तिच्या बॉयफ्रेंडसोबत वेळ घालवताना रितेश तिला रंगेहाथ पकडतो. त्यानंतरचा सगळा ड्रामा या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
सिनेमात झळकणार 'हे' कलाकार
रितेश देशमुख, प्रिया बापट, महेश मांजरेकर, सीमा बिस्वास, जिशु सेनगुप्ता, शीबा चड्ढा, रोहित रॉय,रिद्धी डोगरा,पूर्णेंदु भट्टाचार्य, पार्थ सिद्धपुरा ही कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहे. कूकी गुलाटी याने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. त्याचप्रमाणे अनुराधा लेखी गुप्ता आणि संजय राजप्रकाश गुप्ता यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)