एक्स्प्लोर

विराटला कसा वाटला 'धुरंधर 2'? किंग कोहलीनं दिला रिव्यू, रणवीर सिंहच्या अभिनयावर आढेवेढे न घेता थेटच म्हणाला...

Virat Kohli Reviews Ranveer Singh Dhurandhar 2: टीम इंडियाची रम मशीन दिग्गज क्रिकेटर विराट कोहलीसुद्धा स्वतःला 'धुरंधर 2' (Dhurandhar 2) पाहण्यापासून रोखू शकला नाही. बरं विराटनं 'धुरंधर 2' पाहिलाच नाहीतर, त्यानं आपला रिव्यूसुद्धा केलाय. तर, रणवीर सिंहच्या अभिनयाचं भरभरून कौतुक केलंय. 

Virat Kohli Reviews Ranveer Singh Dhurandhar 2: बॉलिवूड अभिनेता (Bollywood ) रणवीर सिंह स्टार 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar: The Revenge) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. सिनेमानं रिलीज झाल्यापासूनच बॉक्स ऑफिसवर (Dhurandhar 2 BO Collection) कित्येक दिग्गजांना लोळवलंय. अनेकांच्या रेकॉर्ड्सचा चक्काचूरही केलाय. या सिनेमाचा पहिला भागही प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलेला. तर, दुसरा पार्ट तर सुपरडुपर हिट ठरतोय. रिलीज होऊन 19 दिवस लोटले तरीसुद्धा 'धुरंधर 2'ची यशस्वी घौडदौड सुरूच आहे. क्रिकेट जगतातही 'धुरंधर 2'ची क्रेझ पाहायला मिळालीय. अशातच आता टीम इंडियाची रम मशीन दिग्गज क्रिकेटर विराट कोहलीसुद्धा स्वतःला 'धुरंधर 2' (Dhurandhar 2) पाहण्यापासून रोखू शकला नाही. बरं विराटनं 'धुरंधर 2' पाहिलाच नाहीतर, त्यानं आपला रिव्यूसुद्धा केलाय. तर, रणवीर सिंहच्या अभिनयाचं भरभरून कौतुक केलंय. 

सोमवारी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (Royal Challengers Bengaluru) माजी कर्णधार असलेल्या विराट कोहलीनं (Virat Kohli) आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर 'धुरंधर 2'चा रिव्यू पोस्ट केलाय. त्यात त्यानं लिहिलंय की, सिनेमाच्या संपूर्ण चार तासांच्या कालावधीत त्याला स्क्रीनवरून एका क्षणासाठीही आपली नजर हटवता आली नाही. कोहलीनं लिहिलंय की, "मी आज 'धुरंधर 2' सिनेमा पाहिला आणि मी पूर्ण आत्मविश्वासानं असं म्हणू शकतो की, भारतात मला यापूर्वी कधीही असा सिनेमा पाहण्याचा अनुभव आला नव्हता. या सिनेमानं माझ्या मनात सर्व प्रकारच्या भावना जागृत केल्या आणि जवळपास चार तास, मी माझ्या जागेवरून एका क्षणासाठीही हललो नाही..."

दिग्दर्शक आदित्य धरवरही विराट कोहलीनं स्तुतिसुमनं उधळली आहेत. विराटनं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलंय की, "तुम्ही निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीतून तुमची प्रतिभा आणि समर्पण स्पष्टपणे दिसतंय. तुम्हाला माझा सलाम! तुम्ही खरोखरंच एक अद्भूत आहात..." दरम्यान, अभिनेता रणवीर सिंहबद्दल बोलताना कोहली म्हणाला की, "रणवीर सिंह, या सिनेमानंतर तुम्ही एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहात. तुमचा अभिनय केवळ अप्रतिमच नव्हे, तर त्याहूनही कितीतरी श्रेष्ठ होता... खरोखरंच, हा एक अविश्वसनीय अनुभव होता..."

विराटला कसा वाटला 'धुरंधर 2'? किंग कोहलीनं दिला रिव्यू, रणवीर सिंहच्या अभिनयावर आढेवेढे न घेता थेटच म्हणाला...

'धुरंधर 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन (Dhurandhar 2 Box Office Collection)

प्रदर्शित झाल्यापासून, 'धुरंधर 2' सिनेमानं बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडीत काढलेत. सिनेमाच्या कमाईत दिवसेंदिवस वेगानं वाढ होतेय. मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमाच्या एकूण कमाईनं (कलेक्शनने) 1 हजार कोटींचा टप्पा ओलांडलाय. अवघ्या दोन आठवड्यांच्या कालावधीतच, सिनेमाची भारतातील एकूण बॉक्स ऑफिस कमाई 1,134 कोटींवर पोहोचलीय, तर जगभरातील त्याची एकूण कमाई आता 1,501 कोटींवर स्थिरावली आहे. चित्रपटानं नवव्या दिवशी 42 कोटी, दहाव्या दिवशी 64 कोटी, अकराव्या दिवशी 71 कोटी, बाराव्या दिवशी 26 कोटी, तेराव्या दिवशी 28 कोटी, चौदाव्या दिवशी 21 कोटी आणि पंधराव्या दिवशी 19 कोटींची कमाई केलीय.

टीम इंडियाची रन मशीन विराट कोहलीबाबत बोलायचं झाल्यास, तो सध्या आयपीएल 2026 खेळताना दिसतोय. त्यानं आयपीएलच्या दोन सामन्यांमध्ये एकूण 97 धावा केल्यात. त्याचा स्ट्राईक रेट 173 इतका आहे. कोहलीचा संघ, म्हणजेच 'आरसीबी' (RCB), सध्या पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी आतापर्यंतचे दोन्ही सामने जिंकलेत आणि संघाचा पुढला सामना 10 एप्रिल रोजी 'राजस्थान रॉयल्स' विरुद्ध होणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Harshi Rasanga Complaint By Cricketer Bhanuka Rajapaksa: दिग्गज क्रिकेटरच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अभिनेत्रीला केली अटक; जबाब देताच पोलिसही चक्रावले, नेमकं प्रकरण काय?

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget