विराट कोहलीच्या आवडीचं गाणं, यूट्यूबवर 10 कोटी Views; A.R.Rahman कडून निर्मिती; MS Dhoni शी खास कनेक्शन
Virat Kohli Favourite Song Pathu Thala Nee Singam Dhan : सोशल मीडियावर सध्या एका गाण्याची तुफान चर्चा आहे. विराट कोहलीचं देखील हे आवडतं आहे.

Virat Kohli Favourite Song Pathu Thala Nee Singam Dhan : सध्या सोशल मीडियावर सध्या एक गाणं तुफान चर्चेत आहे. या गाण्याचं नाव आहे.."Nee Singam Dhan", असं या गाण्याचं नाव असून ते सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिगला देखील आहे. Nee Singam Dhan या गाण्याची निर्मिती A. R Rahman यांनी केली असून हे गाणं Sid Sriram यांनी गायलंय. सध्या कोल्हापूरच्य माधुरी हत्तीणीचा विषय सोशल मीडियावर चर्चेत आहे. हत्तीणीच्या व्हिडीओसाठी देखील हेच गाणं वापरलं जात आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार याचं देखील हे फेवरेट गाणं आहे. "Nee Singam Dhan", हे एक तमिळ गाणं असून Pathu Thala या सिनेमातील आहे. ज्यामध्ये सिलंबरासन उर्फ सिम्बूने प्रमुख भूमिका साकारली होती. हे गाणं सिम्बूवर चित्रित करण्यात आलं आहे. गमतीशीर गोष्ट म्हणजे, अलीकडे जेव्हा ए. आर. रहमान यांना विचारण्यात आलं की, ते धोनीसाठी कोणतं गाणं गातील, तेव्हा त्यांनी हाच ‘Nee Singam Dhan’ हे गाणंच निवडलं होतं. आयपीएलच्या एका उद्घाटन समारंभात धोनीसाठी हे गाणं गाण्यात आलं होतं.























