विराट कोहलीच्या 3 शब्दांच्या पोस्टने घातला इंटरनेटवर धुमाकूळ; सोबत अनुष्काही.. 15 तासांत 9 मिलियन लाइक्स!
Virat Kohli Viral Post: अवघ्या 15 तासांत, पोस्टला 9 मिलिअन पेक्षा अधिक लाईक्स मिळाले, जे स्वतःच एक विक्रम आहे.

Virat Kohli: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने पुन्हा एकदा सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. सहसा सोशल मीडियापासून अंतर ठेवणाऱ्या कोहलीने रविवारी इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली जी बघता बघता व्हायरल झाली.
या पोस्टमध्ये विराट पत्नी अनुष्का शर्मासोबत दिसत आहे. फोटोमध्ये अनुष्का बसलेली आहे आणि विराट तिच्या मागे जवळ उभा आहे. विशेष म्हणजे, त्याने पोस्टला फक्त तीन शब्दांनी दिले: “Been a minute” अवघ्या 15 तासांत, पोस्टला 9 मिलिअन पेक्षा अधिक लाईक्स मिळाले, जे स्वतःच एक विक्रम आहे.
View this post on Instagram
क्रिकेटच्या दोन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही, विराट कोहलीच्या लोकप्रियतेवर कोणताही परिणाम झालेला नाही. अलिकडच्या एका अहवालात त्याला भारतातील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी ब्रँड म्हणून मान्यता दिलीय.
या पोस्टनंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर उत्साहाने प्रतिक्रिया दिल्या. काहींनी त्याला "GOAT" म्हटले, तर काहींनी त्याच्या आणि अनुष्काच्या जोडीचे कौतुक केले. स्पष्टपणे, विराट कोहलीचे आकर्षण मैदानात आणि मैदानाबाहेरही चाहत्यांमध्ये निर्विवाद आहे.
लंडनमध्ये प्रशिक्षण
विराट सध्या त्याच्या कुटुंबासह युनायटेड किंग्डममध्ये आहे. त्याने तिथे फिटनेस टेस्टही दिली. खरं तर, विराटला बोर्डाने फिटनेस टेस्टमधून सूट दिली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याचे पुनरागमन अपेक्षित आहे.
IPL 2025मध्ये दाखवली आपली कमाल
कोहलीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना बराच काळापूर्वी झाला होता, कारण त्याने कसोटी आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, परंतु आयपीएल 2025 मध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) ला त्यांच्या पहिल्या ट्रॉफीपर्यंत नेले आणि 657 धावा करत त्यांचा सर्वात यशस्वी फलंदाज असल्याचे सिद्ध केले






















