Liger Song Out : विजय देवरकोंडाच्या आवाजातील 'वाट लगा देंगे' गाणं रिलीज; 25 ऑगस्टला सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Liger Song Out : विजय देवरकोंडा यांच्या 'लायगर' या चित्रपटातील 'वाट लगा देंगे' गाणं रिलीज झालं आहे.
Liger Song Out : विजय देवरकोंडा (Vijay Deverkonda) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) स्टारर 'लायगर' (Liger) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून आता 'वाट लगा देंगे' (Waat Laga Denge) या चित्रपटाचे दुसरे गाणेही रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यात विजय देवरकोंडा बॉक्सिंग रिंगमध्ये पूर्ण उत्साहात दिसत आहे. विशेष म्हणजे या गाण्यात विजयने स्वतःचा आवाज दिला आहे.
लायगरचे दुसरे गाणे रिलीज :
हिंदी व्यतिरिक्त तेलगू भाषेतही 'वाट लगा देंगे' हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. हे गाणे सुनील कश्यप यांनी संगीतबद्ध केले आहे. तर पुरी जगन्नाथ यांनी हे गाणं लिहिलं आहे. सर्वात आश्चर्याची आणि महत्वाची बाब म्हणजे स्वत: विजय देवरकोंडाने हे गाणं गायलं आहे. या आधीही विजय देवरकोंडाचे चाहते या चित्रपटाबद्दल उत्सुक होते. मात्र, आता हे गाणं पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी केले आहे. या चित्रपटाद्वारे विजय बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. चित्रपटातून विजय देवकोंडाचे अनेक लूक्स समोर आले आहेत.
हैदराबादनंतर मुंबईतही 'लायगर'चा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. यावेळी इव्हेंटमध्ये चित्रपटाच्या संपूर्ण कलाकारांशिवाय करण जोहर आणि रणवीर सिंगही उपस्थित होते.
'लायगर' हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त इतर चार भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. अमेरिकन बॉक्सर माईक टायसनचीही या चित्रपटात छोटी भूमिका आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान माईक टायसनचे काही फोटोही समोर आले होते. ज्यामध्ये तो चित्रपटाच्या सेटवर मस्ती करताना दिसला होता. चित्रपटात विजय देवरकोंडा, अनन्या पांडे, माईक टायसन, रम्या कृष्णन यांच्याशिवाय दिसणार आहेत. लिगर 25 ऑगस्ट 2022 रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Liger Trailer Launch: ‘लायगर’च्या ट्रेलर लाँचला विजय देवरकोंडाने का परिधान केली चप्पल? समोर आलं कारण...
- Oppenheimer Teaser: 'ओपनहायमर' टीझर लॉन्च; ख्रिस्तोफर नोलन आणणार विनाशकारी अणुबाँबचा जनक पडद्यावर
- Secrets Of The Kohinoor : 'सीक्रेट्स ऑफ द कोहिनूर' मधून उलगडणार कोहिनूर हिऱ्याचा इतिहास; डॉक्यूमेंट्री 'या' दिवशी होणार रिलीज