Secrets Of The Kohinoor : 'सीक्रेट्स ऑफ द कोहिनूर' मधून उलगडणार कोहिनूर हिऱ्याचा इतिहास; डॉक्यूमेंट्री 'या' दिवशी होणार रिलीज
मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांनी एका मुलाखतीमध्ये 'सीक्रेट्स ऑफ द कोहिनूर' (Secrets of the Kohinoor) या डॉक्यूमेंट्रीबाबत सांगितलं आहे.
![Secrets Of The Kohinoor : 'सीक्रेट्स ऑफ द कोहिनूर' मधून उलगडणार कोहिनूर हिऱ्याचा इतिहास; डॉक्यूमेंट्री 'या' दिवशी होणार रिलीज Manoj Bajpayee explores journey of diamond kohinoor in Secrets Of The Kohinoor Secrets Of The Kohinoor : 'सीक्रेट्स ऑफ द कोहिनूर' मधून उलगडणार कोहिनूर हिऱ्याचा इतिहास; डॉक्यूमेंट्री 'या' दिवशी होणार रिलीज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/28/2950ca8dfe3a721d024cc66ab98a87931659005944_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Secrets Of The Kohinoor : बॉलिवूडजमधील प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) हे त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. त्यांची 'सीक्रेट्स ऑफ द कोहिनूर' (Secrets of the Kohinoor) ही डॉक्यूमेंट्री लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या डॉक्यूमेंट्रीमधून कोहिनूर हिऱ्याचा इतिहास प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे. मनोज वाजपेयी यांनी एका मुलाखतीमध्ये या डॉक्यूमेंट्रीबाबत सांगितलं आहे.
मनोज वायजपेय यांनी मुलाखतीमध्ये सांगितले की या डॉक्यूमेंट्रीमुळे त्यांनी कोहिनूर हिऱ्याचा इतिहास आणि माहिती कळाली. ते म्हणाले, 'गेली कित्येक वर्ष कोहिनूर हिऱ्याबाबत चर्चा होत आहे. पण अनेक गोष्टी आपल्याला माहित नाहीयेत. जगातील अनेक लोकांना कोहिनूर हिऱ्याबद्दल माहिती नसते. डॉक्यूमेंट्रीमध्ये देण्यात आलेली माहिती ऐकून मी स्वत: आश्चर्यचकित झालो. आता हे पाहून प्रेक्षक देखील आश्चर्यचकित होणार आहेत.'
कोहिरनूर हिऱ्याची किंमत तसेच या हिऱ्याचे वजन अशा बऱ्याच गोष्टींबाबत काही एक्सपर्ट्स या डॉक्यूमेंट्रीमध्ये सांगण्यात येणार आहेत. डॉ. शशि थरूर, इतिहासकार इरफान हशबीब, डॉ. एड्रिएन म्यूनिख, प्रो. फरहत नसरीन, के.के. मोहम्मद, डॉ. मानवेंद्र कुमार पुंधीर, नवतेज सरना, जे. साई दीपक, डॉ. डेनियल किन्से, डॉ. माइल्स टेलर आणि मास्टर डायमंड पॉलिशर सुश्री पॉलीन विलेम्स हे या डॉक्यूमेंट्रीमध्ये प्रेक्षकांना माहिती देणार आहेत.
View this post on Instagram
राघव जैरथ यांनी या डॉक्यूमेंट्रीचे दिग्दर्शन केलं आहे. 'सीक्रेट्स ऑफ द कोहिनूर' या डॉक्यूमेंट्रीचा प्रीमिअर चार ऑगस्ट रोजी डिस्कवरी प्लस या चॅनलवर होणार आहे.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)