Govinda Naam Mera trailer Out : सस्पेन्सबरोबर कॉमेडीचा तडका; 'गोविंदा नाम मेरा' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज
Govinda Naam Mera trailer Out : विकी कौशल, भूमी पेडणेकर, कियारा अडवाणी स्टारर 'गोविंदा नाम मेरा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
Govinda Naam Mera trailer Out : बहुप्रतिक्षित 'गोविंदा नाम मेरा' (Govinda Naam Mera) या सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal), भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांनी अभिनय केलेल्या या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहात होते. आता या सिनेमाच्या ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. या सिनेमाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
'गोविंदा मेरा नाम'चा ट्रेलर रिलीज
'गोविंदा नाम मेरा'च्या ट्रेलरची सुरुवात विकी कौशल आणि कियारा अडवाणीच्या दृष्यापासून होते. या सिनेमात कियारा विकीची प्रेयसी दाखविण्यात आली आहे. तर, भूमी पेडणेकर एका वर्चस्व गाजवणाऱ्या पत्नीची भूमिका साकारत आहे. गोविंदाला (विक्की) कोरिओग्राफर व्हायचं स्वप्न आहे. पण, त्याची पत्नी गौरी (भूमी) त्याला वारंवार टोमणे मारताना दिसते. याशिवाय अनेक रंजक गोष्टी ट्रेलरमध्ये दाखविण्यात आल्या आहेत.
पत्नी, प्रेयसी आणि खून प्रकरणात अडकलेला गोविंदा
पत्नीच्या अत्याचाराचा सामना करणाऱ्या गोविंदाचे आयुष्य सुकूला (कियारा) भेटल्यावर पूर्णपणे बदलून जाते. सुकूलाही गोविंदाप्रमाणे कोरिओग्राफर व्हायचे आहे. ट्रेलरमध्ये गोविंदा गौरीकडे बंदूक दाखवतानाही दिसत आहे. यानंतर कोणीतरी रक्तस्त्राव झाल्याचे ऐकू येते. याचा दोष गोविंदावर येतो. मात्र, पोलिसांना मृतदेह सापडत नाही. आता सिनेमात कोणाच्या रक्तात काय घडले हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल.
या चित्रपटाची निर्मिती करण जोहरने केली आहे. शशांक खेतान दिग्दर्शित 'गोविंदा नाम मेरा' हा चित्रपट 16 डिसेंबर 2022 रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. कियारा, भूमी आणि विकी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.
'गोविंदा नाम मेरा' चित्रपटात भूमिक पेडणेकर आणि कियारा अडवाणी पहिल्यांदाच विकी कौशलबरोबर स्क्रिन शेअर करत आहेत. तिघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यामुळे चाहते खूप खूश आहेत.
विकी 'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटाबरोबरच 'सॅम बहादुर' या आगामी चित्रपटामधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विकीच्या आगामी चित्रपटांची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
Chup On OTT : सनी देओल अन् दुलकर सलमानचा 'चुप' ओटीटीवर होणार रिलीज; जाणून घ्या कुठे होणार रिलीज?