बेबी जॉन ठरला फ्लॉप, वरुण धवन थेट डिप्रेशनमध्ये? राजपाल यादवनं दिली महत्त्वाची माहिती!
वरुण धवनचा बेबी जॉन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल करू शकला नाही. हा चित्रपट फ्लॉप ठरला आहे. असे असताना राजपाल यादव यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
Varun Dhawan Baby John : बॉलिवुडचा प्रसिद्ध अभिनेता वरुण धवनचा नुकताच बेबी जॉन हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र पुष्पा-2 च्या वादळात या चित्रपटाची धुळधाण उडाली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पुरता आपटला आहे. दरम्यान, हा चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर त्यामध्ये भूमिका करणाऱ्या राजपाल यादवने वरुण धवनबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. सध्या वरुण धवन डिप्रेशनमध्ये आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना राजपाल यादव यांनी बरंच काही सांगितलं आहे.
वरुण धवन डिप्रेशनमध्ये आहे का?
वरुण धवन प्रमुख भूमिकेत असलेल्या बेबी जॉन या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांनी भूमिका केलेली आह कीर्ति सुरेश, जॉकी श्रॉफ, वामिका गब्बी आदी बडे कलाकार या चित्रपटात आहेत. तरीदेखील हा चित्रपट लोकांना आवडलेला नाही. याच चित्रपटावर राजपाल यादव यांनी भाष्य केलं आहे. राजपाल यादव यांना बेबी जॉन हा चित्रपट फ्लॉप का झाला आहे, त्यामुळे वरुण धवन डिप्रेशनमध्ये आहे का? असे विचारण्यात आले. या प्रश्नाचे उत्तर देताना वरुण धवन डिप्रेशनमध्ये नाही. तो खूप छान कलाकार आहे. खूप मेहनती आहे. तो नेहमी काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात असतो. त्याच्या या प्रयत्नांचं कौतुक केलं पाहिजे. कारण आजकाल जोखीम पत्करणं फार मोठी बाब आहे, असं राजपाल यादवने सांगितलं.
बेबी जॉन रिमेक असल्यानं प्रेक्षकांनी फिरवली पाठ
बेबी जॉन हा चित्रपट Theri या चित्रपटाचा रिमेक आहे. बेबी जॉन हा चित्रपट Theri चित्रपटाचा रिमेक नसता तर वरुण धवनच्या 25 वर्षांच्या करिअरमधील हा सर्वोत्तम चित्रपट असता. मात्र थलापती विजयने हा चित्रपट याआधीच केलेला आहे. प्रेक्षक हा चित्रपट अगोदरच पाहून बसलेले आहेत. बेबी जॉन हा चित्रपट रिमेक असल्यामुळे त्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवर झाला. या चित्रपटात राजपाल यादवने पोलीस कॉन्स्टेबल रामसेवकची भूमिका साकारलेली आहे.
वरुण धवनचे अनेक दर्जेदार चित्रपट येणार
दरम्यान, राजपाल यादवे हे एक चांगले मुरलेले कलाकार आहेत. 20204 साली त्यांचा भूलभलैया-3 हा चित्रपट आला होता. या चित्रपटात कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षित आदी स्टार्स होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. तर दुसरीकडे वरुण धवनचेही आगामी काळात अनेक चित्रपट येणार आहेत. सनी संस्कारी की तुलसी कुमारी, भेड़िया 2 आणि बॉर्डर 2 अशा महत्त्वाच्या चित्रपटांत तो दिसणार आहे.
हेही वाचा :