एक्स्प्लोर

वैभव मांगलेची धडाकेबाज एन्ट्री! ‘वचन दिले तू मला’मध्ये गाजवणार पोलीस अधिकारी; नवी भूमिका पाहून एकच चर्चा

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘वचन दिले तू मला’मध्ये वैभव मांगले वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ गुडपल्लीवार या भूमिकेत झळकणार आहे.

Vachan Dile Tu Mala Marathi Serial: नाटक, सिनेमा, मालिका असो किंवा वेबसीरिज  या चारही माध्यमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने ठसा उमटवणारा अभिनेता म्हणजे वैभव मांगले. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या, लक्षात राहणाऱ्या भूमिका साकारत त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता पुन्हा एकदा तो छोट्या पडद्यावर एका महत्त्वाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘वचन दिले तू मला’मध्ये वैभव मांगले वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ गुडपल्लीवार या भूमिकेत झळकणार आहे.

दमदार अभिनेत्याची नवी जबाबदारी

वैभव मांगले मुळचा कोकणातील असल्यामुळे कोकणी, मालवणी आणि वऱ्हाडी या तिन्ही बोलीभाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. मात्र ‘वचन दिले तू मला’ मालिकेतील त्याचे पात्र बेळगावी पार्श्वभूमीचं असल्यामुळे या भूमिकेच्या निमित्ताने तो बेळगावी भाषेचा गोडवाही अनुभवणार आहेत. ही बाब त्यांच्या अभिनयात आणखी एक वेगळा रंग भरणारी ठरणार आहे.

‘जगन्नाथ गुडपल्लीवार’ नेमकं कसं आहे हे पात्र?

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ गुडपल्लीवार हे पात्र सर्वसाधारण पोलिस अधिकाऱ्यापेक्षा वेगळं आहे. वैभव मांगले या पात्राविषयी सांगताना म्हणाला, “हे पात्र खूप वेगळं आहे. अतिशय इमानदार आहे असं थेट म्हणता येणार नाही. पण जेव्हा खरंच अन्याय होतो, तेव्हा पीडिताला न्याय मिळवून द्यायची त्याची पूर्ण तयारी असते. गुन्हेगारांकडून गुन्हा कबूल करून घेणं ही त्याची खास हातोटी आहे.”

 तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि सिस्टीमची जाण

तीक्ष्ण बुद्धिमत्ता, अनुभव आणि सिस्टीम कोळून प्यायलेला अधिकारी म्हणून जगन्नाथ गुडपल्लीवारची ओळख आहे. कायद्याच्या चौकटीत राहून, प्रसंगी स्वतःची पद्धत वापरत तो गुन्हे उकलतो. या सगळ्या बारकाव्यांमुळे हे पात्र साकारताना वैभव मांगलेला  वेगळाच अनुभव मिळत असल्याचं त्याने सांगितलं.

प्रेक्षकांसाठी खास आकर्षण

दमदार संवाद, वेगळी देहबोली आणि ठसकेबाज अभिनयामुळे हे पात्र प्रेक्षकांना नक्कीच भावेल, असा विश्वास वैभव मांगले व्यक्त करतात. त्यामुळे ‘वचन दिले तू मला’ मालिकेत येणारा हा नवा ट्विस्ट प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारा ठरणार आहे.‘वचन दिले तू मला’ दररोज रात्री 9.30 वाजता, फक्त स्टार प्रवाहवर.

महत्त्वाच्या बातम्या

Aai Kuthe Kay Karte Actress in Eetha: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
OTT Thriller Webseries: ‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा
‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Rekha Fitness Transformation:'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Rishabh Pant News : 3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Embed widget