एक्स्प्लोर

Popular Actress Neck Surgery: चार-चार तास बेडवर पडून गेम, रील्स पाहण्यात तासनतास घालवले; लोकप्रिय अभिनेत्रीच्या मानेची थेट सर्जरी; आता साधं उठणं-बसणंही झालं कठीण

आता बेडवरून उठणं, जेवण करणं यांसारख्या अगदी साध्या गोष्टींसाठीही इतरांची मदत घ्यावी लागत असल्याचं त्यांनी सांगितलं.

Popular Actress Neck Surgery: मोबाइलवर गेम खेळताना किंवा तासन्‌तास रील्स पाहताना आपण अनेकदा वेळेचं भान विसरतो. पण या सवयीचा शरीरावर किती गंभीर परिणाम होऊ शकतो, याचा धक्कादायक अनुभव एका लोकप्रिय  अभिनेत्रीला आलाय. बेडवर एका कुशीवर झोपून तासन्‌तास मोबाइल वापरण्याची सवय त्यांना चांगलीच महागात पडलीय. मानेच्या नसांवर गंभीर परिणाम झाल्यानंतर अखेर त्यांच्यावर तब्बल 3 लाख रुपये खर्चाची शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. शस्त्रक्रियेनंतर नेक कॉलर लावलेल्या अवस्थेत लोकप्रिय दक्षिणात्य अभिनेत्री शकीला (Shakeela Neck Surgery) यांनी स्वतःचा अनुभव सांगत चाहत्यांना मोबाइलच्या अतिवापराबाबत सावध केलं आहे.

चार-चार तास बेडवर पडून गेम, मग रील्समध्ये तासनतास घालवले..

शकीला यांनी आपल्या यूट्यूब व्लॉगमधून या संपूर्ण अनुभवाबद्दल सांगितलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या बेडवर एका कुशीवर झोपून तब्बल चार तास सलग मोबाइलवर गेम खेळायच्या. या काळात त्या केवळ चहा किंवा कॉफी घेण्यासाठी उठायच्या. चहा झाला की पुन्हा मोबाइल हातात घेऊन गेम सुरू! गेम संपल्यानंतरही मोबाइलपासून सुटका नव्हती. त्यानंतर यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवरील रील्स पाहण्यात तासन्‌तास निघून जायचे. अशा चुकीच्या पोस्चरमध्ये दीर्घकाळ मोबाइल वापरल्याचा परिणाम त्यांच्या मानेवर झाला. हळूहळू मानेच्या नसांवर परिणाम झाला आणि परिस्थिती इतकी गंभीर झाली की अखेर डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. या ऑपरेशनसाठी त्यांना जवळपास ३ लाख रुपये मोजावे लागले.

आता साधं उठणं-बसणंही झालं कठीण

शस्त्रक्रियेनंतर शकीला यांना नेक कॉलर घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांच्या व्लॉगमध्ये त्या नेक कॉलर घातलेल्या अवस्थेत दिसतात. रुग्णालयातून घरी आल्यानंतरच्या काही झलकाही त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केल्या. शस्त्रक्रियेनंतरच्या परिस्थितीवर बोलताना शकीला यांनी स्वतःचीच  खिल्ली उडवली. आता बेडवरून उठणं, जेवण करणं यांसारख्या अगदी साध्या गोष्टींसाठीही इतरांची मदत घ्यावी लागत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, “माझी नुकतीच मोठी शस्त्रक्रिया झाली आहे. फोन खूप उपयोगी गोष्ट आहे, पण त्याचा गरजेपेक्षा जास्त वापर करू नका.”

‘माझ्यासारखी चूक करू नका’

शकीला यांनी आपल्या अनुभवातून इतरांना सावध करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः मुलांना मोबाइल देताना पालकांनी काळजी घ्यावी, असं त्यांनी सांगितलं. “फोनचा वापर फक्त आवश्यक कामांसाठी करा. उगाच व्हिडीओ पाहत बसू नका. माझे व्हिडीओसुद्धा पाहू नका, फक्त कामाचे व्हिडीओ पाहा. नाहीतर तुमचेही 3 लाख रुपये खर्च होऊ शकतात आणि त्यासोबत प्रचंड वेदना सहन कराव्या लागू शकतात,” असा मजेशीर पण गंभीर इशारा त्यांनी दिला.

साउथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय नाव..

शकीला यांची ओळख केवळ त्यांच्या या व्हिडीओमुळे नाही, तर मल्याळम चित्रपटसृष्टीतील त्यांच्या वेगळ्या प्रवासामुळेही आहे. आंध्र प्रदेशातील नेल्लोरजवळ जन्मलेल्या शकीला यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला सॉफ्टकोर अडल्ट चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र, ‘किन्नाराथुम्बिकल’ (2000) या चित्रपटाने त्यांच्या करिअरला मोठी कलाटणी दिली. आर. जे. प्रसाद दिग्दर्शित या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली. अवघ्या 12  लाख रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जवळपास 4 कोटी रुपयांची कमाई केली आणि शकीला रातोरात लोकप्रिय झाल्या. शकीला यांनी नंतर मुख्य प्रवाहातील चित्रपटांकडेही मोर्चा वळवला. मोहनलाल यांच्या ‘छोटा मुंबई’ (2007) आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या ‘तेजा भाई अँड फॅमिली’ (2011) या चित्रपटांमध्ये त्यांनी छोट्या भूमिका साकारल्या. मल्याळमसोबतच तमिळ, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं आहे. ‘मरु मलार्ची’, ‘थोट्टी गँग’, ‘जयम’, ‘मोनालिसा’, ‘बंगारम’, ‘अझगिया तमिळ मगन’, ‘शिवा मनसुला शक्ती’, ‘बॉस एंगिरा भास्करन’, ‘वासुवुम सरवननुम ओन्ना पडिचावंगा’ आणि ‘मधा गजा राजा’ हे त्यांचे काही लोकप्रिय चित्रपट आहेत.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah FDA Promo: तुकाराम मुंढेंच्या FDA ची 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दहशत, माधवी भिडेंना मोठा धक्का, PROMO पाहिला?
तुकाराम मुंढेंच्या FDA ची 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दहशत, माधवी भिडेंना मोठा धक्का, PROMO पाहिला?
Popular Actress Neck Surgery: चार-चार तास बेडवर पडून गेम, रील्स पाहण्यात तासनतास घालवले; लोकप्रिय अभिनेत्रीच्या मानेची थेट सर्जरी; आता साधं उठणं-बसणंही झालं कठीण
चार-चार तास बेडवर पडून गेम, रील्स पाहण्यात तासनतास घालवले; लोकप्रिय अभिनेत्रीच्या मानेची थेट सर्जरी; आता साधं उठणं-बसणंही झालं कठीण
'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरच्या Ex नवऱ्यानं केलं दुसरं लग्नं, पत्नीवर प्रेमाचा वर्षाव; अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली...
'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरच्या Ex नवऱ्यानं केलं दुसरं लग्नं, पत्नीवर प्रेमाचा वर्षाव; अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली...
Sonu Nigam On CJP Protest Reaction: 'मी माझ्या वडिलांना वचन दिलंय..', CJP आंदोलनावर प्रतिक्रिया न देता संतापून निघून गेला; सोनू निगमने सांगितलं गप्प राहण्याचं कारण; म्हणाला...
'मी माझ्या वडिलांना वचन दिलंय..', CJP आंदोलनावर प्रतिक्रिया न देता संतापून निघून गेला; सोनू निगमने सांगितलं गप्प राहण्याचं कारण; म्हणाला...
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Embed widget