Usha Nadkarni Expressed Her Grief: 'घरात एकटीच असते, पडले तरी कुणाला समजणार नाही...'; उषा नाडकर्णींचे काळजाला चटका लावणारे उद्गार
Usha Nadkarni Expressed Her Grief: अंकिता लोखंडेनं 2009 मध्ये आलेल्या पवित्र रिश्ता या मालिकेतून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. त्यात सुशांत सिंह राजपूत देखील दिसला होता.

Usha Nadkarni Expressed Her Grief: मराठमोळी अभिनेत्री (Marathi Actress) अंकिता लोखंडेला (Ankita Lokhande) नुकतीच इंडस्ट्रीत काम करुन 16 वर्ष पूर्ण झाली आहेत. अंकिता लोखंडे सध्या लाफ्टर शेफमध्ये स्पर्धक म्हणून दिसतेय. तिच्यासोबत तिचा पती विक्कीसुद्धा लाफ्टर शेफमध्ये दिसतोय. त्यासोबतच अंकिता व्लॉगही बनवत असते. तिच्या युट्यूब चॅनलवरच्या लेटेस्ट व्लॉगमध्ये मध्ये, अंकिता लोखंडे 'पवित्र रिश्ता' मधल्या अर्चनासारख्या गेटअपमध्ये दिसली आणि तिच्यासोबत तिच्या ऑनस्क्रीन सासूबाई उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) देखील दिसल्या.
अंकिता लोखंडेनं 2009 मध्ये आलेल्या पवित्र रिश्ता (Pavitra Rishta Serial) या मालिकेतून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. त्यात सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) देखील दिसला होता. या व्लॉगमध्ये बोलताना अंकिता आणि उषाताईंनी पवित्र रिश्ताच्या सेटवरच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यासोबतच त्यांनी सुशांत सिंह राजपूतसोबतच्या आठवणीही ताज्या केल्या. अंकिता आणि उषाताईंनी खूप गप्पा मारल्या. पण, त्यांच्या गप्पांमध्ये एक क्षण असा होता की, ज्यानं उषाताईंचे डोळे पाणावले.
अंकिता लोखंडेनं तिचा हा व्लॉग 2 जून रोजी युट्यूबवर शेअर केला. या व्हिडीओमध्ये उषाताईंनी सांगितलं की, 79 वर्षांच्या वयातही त्या मुंबईसारख्या महानगरात एकट्या राहतात. उषाताईंना हे वाक्य बोलतानाच गहिवरुन आलं.
उषाताईंना रडू कोसळलं, म्हणाल्या...
व्लॉगमध्ये बोलताना उषा नाडकर्णी म्हणाल्या की, "मी घरी एकटीच असते, मला भीती वाटते की, मी पडले तरी, कोणालाही कळणार नाही. गेल्या वर्षी 30 जून रोजी माझ्या भावाचं निधन झालं. जर त्याला माहीत असतं की, मी कोणत्या संकटात आहे, तर तो माझ्याकडे धावत आला असता. आता, मी कोणाला सांगू?"
अंकिता लोखंडे काय म्हणाली?
अंकिता लोखंडे म्हणाली की, "आई खूप मजबूत आहे. ती एकटीच राहते. ती इतक्या वर्षांपासून एकटीच राहते. मी इतक्या वर्षांपासून आईला पाहत आहे." पुढे बोलताना अंकितानं सुशांत सिंह राजपूतसोबतच्या आठवणींनाही उजाळा दिला. अंकिता म्हणाली की, "सुशांत खूप चांगला अभिनेता होता. तो मला खूप मदत करायचा कारण जेव्हा मी सर्व कलाकारांसमोर जायचे, तेव्हा मला इतके मोठे सीन कसे करायचे? याबद्दल खूप भीती वाटायची. तेव्हाव तो मला शिकवायचा."
दरम्यान, अंकिता लोखंडेनं तिच्या मुंबईतील घरी एका भव्य पार्टीचं आयोजन केलं होतं, ज्यामध्ये तिची पहिली टेलिव्हिजन सीरिअल पवित्र रिश्तामध्ये तिच्या सासुबाई सविता देशमुखांची भूमिका साकारणाऱ्या उषा नाडकर्णी यांना आमंत्रित केलं होतं. दोघींनीही व्लॉगमध्ये पवित्र रिश्ता मालिकेच्या सेटशी संबंधित गोष्टी शेअर केल्या. दोघांमधील मैत्री इतक्या वर्षांनीही तितकीच घट्ट असल्याचं पाहून चाहतेही खूश झाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























