(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Exclusive : मिस युनिवर्स हरनाजबद्दल उर्वशी रौतेलाने व्यक्त केल्या भावना; म्हणाली...
Miss Universe 2021 : चंदीगढ गर्ल हरनाज संधू ही नुकतीच (Harnaaz Sandhu) विश्वसुंदरी (Miss Universe 2021) किताबची मानकरी ठरली आहे.
Miss Universe 2021 : चंदीगढ गर्ल हरनाज संधू ही नुकतीच (Harnaaz Sandhu) मिस युनिवर्स (Miss Universe 2021) किताबाची मानकरी ठरली आहे. तब्बल 21 वर्षांनंतर हरनाजने भारतासाठी विश्वसुंदरीचा किताब पटकावला आहे. याआधी 2000 साली लारा दत्तानं (Lara Dutta) विश्वसुंदरी होण्याचा मान मिळवला होता. यंदाच्या मिस युनिवर्स स्पर्धेची उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही परीक्षक होती. नुकताच उर्वशीने एबीपी न्यूजसोबत संवाद साधला.
एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये उर्वशीने सांगितले की, 80 देशांमधून आलेल्या स्पर्धकांपैकी भारताची हरनाज संधू हिच मिस युनिवर्स स्पर्धेत जिंकेल असा तिला विश्वास होता. पुढे उर्वशी म्हणाली, 'हरनाजला मिस युनिरवर्स होताना पाहणं हा माझ्यासाठी अत्यंत आनंदी क्षण होता. मी हरनाजच्या प्रत्येक गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिले आणि तिला प्रत्येक राऊंडला चांगले गुण दिले. '
उर्वशीने सांगितले की, कोणत्याही स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकाला 'ब्यूटी विथ पर्पज' असणे गरजेच असते. हिच गोष्ट उर्वशीला हरनाजमध्ये दिसली. हरनाजचा आत्मविश्वास देखील चांगला होता, असं उर्वशीने सांगितलं.
View this post on Instagram
स्पर्धेतील 6 तासांच्या सिलेक्शन प्रक्रिये दरम्यान बाकी स्पर्धकांप्रमाणेच उर्वशीने हरनाजची प्रोफाइल देखील बारकाईने पाहिली. उर्वशीने 'मिस युनिवर्स' (Miss Universe) स्पर्धेत 2015 साली भारताचं प्रतिनिधित्व केले. तिने 2015मध्ये 'मिस डिवा युनिवर्स' किताब मिळवला. त्यानंतर उर्वशीने 2013 मध्ये आलेल्या 'सिंग साब द ग्रेट' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती ''सनम रे', 'ग्रेट गँड मस्ती', 'हेट स्टेरी 4' आणि 'पागलपंती' अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकली.
संबंधित बातम्या
Miss universe 2021 : उर्वशी रौतेला 'मिस युनिवर्स' स्पर्धेची परीक्षक, हरनाजच्या विजयानंतर अश्रू अनावर