एक्स्प्लोर

Ujawal Nikam On Gulshan Kumar Murder Case: 'गुलशन कुमार यांच्या हत्येचा मास्टरमाईंड...'; बड्या वकिलाचा खळबळजनक दावा, दिग्गज गायिकांचं नाव घेत म्हणाले...

Ujawal Nikam On Gulshan Kumar Murder Case: संगीतकार जोडीतील (नदीम-श्रवण) नदीम सैफी (Nadeem Saifi) हा कट रचणाऱ्यांपैकी एक म्हणून समोर आला. त्यानंतर लवकरच नदीम देश सोडून पळून गेला. 

Ujawal Nikam On Gulshan Kumar Murder Case: बॉलिवूडला (Bollywood News) हादरवणाऱ्या देशातल्या सर्वात मोठ्या हत्याकांडाबाबत दिग्गज वकील उज्ज्वल निकम (Ujawal Nikam) यांनी खळबळजनक दावा केला आहे. तसेच, या प्रकरणात त्यांनी अनेक मोठे खुलासे केले आहेत. 1997 मध्ये, जेव्हा टी-सीरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांची दिवसाढवळ्या हत्या झाली, तेव्हा बॉलिवूड हादरलेलं. त्यावेळी, बॉलिवूडचे अंडरवर्ल्ड गुन्हेगारांशी संबंध (Bollywood's Links With Underworld Criminals) असल्याच्या बातम्या समोर येत होत्या, पण रस्त्याच्या मधोमध एका प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याची हत्या होईल, अशी कल्पना कोणीही केली नव्हती. जेव्हा तपास सुरू झाला, तेव्हा संगीतकार जोडीतील (नदीम-श्रवण) नदीम सैफी (Nadeem Saifi) हा कट रचणाऱ्यांपैकी एक म्हणून समोर आला. त्यानंतर लवकरच नदीम देश सोडून पळून गेला. 

शुभंकर मिश्रा यांच्या मुलाखतीत बोलताना सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी गुलशन कुमार मर्डर केसबद्दल बोलताना खळबळजनक दावा केला. त्यांनी दावा केला की, नदीम हा गुलशन कुमार यांच्या हत्येच्या कटाचा 'मास्टरमाइंड' होता. गुलशन कुमार यांची हत्या का करण्यात आली? असं विचारल्यावर, उज्ज्वल निकम यांनी सांगितलं की, हे त्या काळातील सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल आणि अलका याज्ञिक यांच्यातील कथित शत्रुत्वाशी संबंधित असू शकतं.

नदीम गुलशन कुमारांच्या हत्येचा मास्टरमाइंड 

उज्ज्वल निकम म्हणाले की, "हो, तो (गुलशन कुमारच्या हत्येत) सामील होता. म्हणूनच तो परत येत नाही... त्याच्यावर खटला चालत नाहीये. नाहीतर, त्याला खटल्याला सामोरं का जावं लागलं नसतं?" नदीम अनेक वर्षांपासून यूकेमध्ये राहत होता आणि आता दुबईमध्ये राहतो. काही वर्षांपूर्वी, नदीम म्हणाला की, तो परत येऊ इच्छितो... याबद्दल उज्ज्वल निकम म्हणाले, "त्यानं परत येण्याची ऑफर दिली आणि मी म्हटले, 'नक्कीच, परत ये आणि खटल्याला सामोरं जा..." तो येऊ इच्छित नाही. जेव्हा आम्ही त्याला लंडनहून सरेंडर  करण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा आम्ही त्याच्याशी बोललेलो..."

गुलशन कुमार यांनी हत्या झालीच का? उज्ज्वल निकम म्हणाले...

गुलशन कुमार यांची हत्या का करण्यात आली? याबाबत बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले की, "ही एक वेगळीच गोष्ट आहे... अनुराधा पौडवाल ही त्यांची (गुलशन कुमारची) गायिका होती, अलका याज्ञिक ही नदीम-श्रवणची गायिका होती... बस्स..." उज्ज्वल निकम पुढे म्हणाले की, "पोलिसांचं म्हणणं आहे की, नदीमनं हा कट रचलेला..." नदीमच्या आदेशावरूनच हत्येचा कट रचण्यात आला होता आणि दुबईमध्ये हा कट रचण्यात आला होता. 

निर्दोष असल्याचा सातत्यानं दावा केला, पण भारतात आला नाही... 

1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात नदीम सैफी ब्रिटनला गेल्यानंतर, अनेक चित्रपट निर्मात्यांनी त्याच्यासोबत काम करणं सुरूच ठेवलेलं. गुलशन कुमार यांच्या हत्येपासून नदीमनं सातत्यानं आपण निर्दोष असल्याचा दावा करत राहिला, पण तो कधीच भारतात परतला नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Singer Lucky Ali Criticizes Lyricist Javed Akhtars: 'जावेद अख्तर सारखं बनू नका, फेक...'; दिग्गज गायकाची युजरच्या पोस्टवर कमेंट, सोशल मीडियावर चाहते भिडले

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Pune Election : पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
Embed widget