एक्स्प्लोर

Tumbadachi Manjula Upcoming Marathi Movie: 'एका बाईच्या वाजल्या बांगड्या, की सगळ्या बाप्यांच्या थरथरल्या तंगड्या...'; गूढ वाढवणाऱ्या 'तुंबाडची मंजुळा'चा टीझर पाहिलात?

Tumbadachi Manjula Upcoming Marathi Movie: 'तुंबाडची मंजुळा' चित्रपटाविषयी झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात की, "यापूर्वी प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरला मिळालेला प्रचंड प्रतिसाद बघता या टीझरमधून प्रेक्षकांची उत्सुकता कशी वाढेल यावर आम्ही भर दिला.

Tumbadachi Manjula Upcoming Marathi Movie: आपल्या पहिल्या पोस्टर मधूनच चित्रपटाच्या नावाविषयी, यातील कलाकारांविषयी आणि चित्रपटाची नेमकी गोष्ट काय असेल? याविषयी प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण करणारा चित्रपट म्हणजे, 'तुंबाडची मंजुळा'. झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचा धमाल आणि उत्कंठावर्धक टिझर आता प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.  येत्या 5 जूनला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या टीझरमधून 'मंजुळा' या नावाविषयी तयार झालेलं गुढतेचं वलय, त्यावरून गावकऱ्यांमध्ये निर्माण झालेली भीती आणि त्यांची उडालेली तारांबळ दिसत आहे. या गावकऱ्यांमध्ये एकाहून एक अतरंगी कलाकार दिसत असून यामध्ये जितेंद्र जोशी (Jitendra Joshi), ओम भुतकर (Om Bhutkar), मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure), अंशुमन विचारे (Anshuman Vichare),  योगेश शिरसाट (Yogesh Shirsat), गणेश पंडित, सिद्धेश्वर झाडबुके, वर्षा दांदळे, शार्दुल सराफ, रीलस्टार अथर्व रुके (Reel Star Atharva Ruke), नवोदित अभिनेत्री प्रियल नाईक आणि उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) यांचा समावेश आहे. यातही एका भविष्य सांगणाऱ्या गुरुजीच्या वेशात दिसणारे मकरंद अनासपुरे यांचा लूक, त्यांची देहबोली आणि संवाद प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.  यासोबतच सगळ्यात जास्त आकर्षणाचा विषय ठरली आहे टीझरच्या शेवटी एका अर्धवट बंद दाराआड उभी दिसणारी सई ताम्हणकर (Sai Tamhankar). यामध्ये सईची काय भूमिका असेल? याबद्दल सर्वांच्या मनात कुतूहल निर्माण झालं आहे.

'तुंबाडची मंजुळा' चित्रपटाविषयी झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात की, "यापूर्वी प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरला मिळालेला प्रचंड प्रतिसाद बघता या टीझरमधून प्रेक्षकांची उत्सुकता कशी वाढेल यावर आम्ही भर दिला. आता प्रदर्शित झालेल्या टिझरमधून दिसणारी कलाकारांची फौज, त्यांचे धमाल संवाद हे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. मुळात कोकण प्रांत आणि कोकणातील लोकांच्या गजाली हा कायमच आपल्या आवडीचा विषय असतो. कोकणातील अशाच एका गावाची, त्यातील गावकऱ्यांची आणि गावात घडणाऱ्या एका अद्भुत घटनेची गोष्ट म्हणजे तुंबाडची मंजुळा हा चित्रपट. सर्वच स्तरांतील, वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल आणि सहकुटुंब बघता येईल असा हा मनोरंजक चित्रपट झाला आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक वर्षानंतर झी स्टुडिओजने पूर्णपणे निर्मितीची धुरा सांभाळली आहे याचा आनंद आहे..."

दरम्यान, ऋषिकेश तुरई यांचे लेखन असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विविध कोरगांवकर या नव्या दमाच्या दिग्दर्शकाने केले आहे. झी स्टुडिओजतर्फे उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून येत्या 5 जून रोजी तो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

पाहा टीझर : 

महत्त्वाच्या बातम्या

Mithun Chakraborty Sridevi Affair Clim: 'त्यावेळी तीन महिने नवरा-बायकोप्रमाणे एकत्र राहिलेले...'; श्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्तींबाबत चक्रावणारा दावा
'त्यावेळी तीन महिने नवरा-बायकोप्रमाणे एकत्र राहिलेले...'; श्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्तींबाबत चक्रावणारा दावा
Nikita Rawal Angry On Ranbir Kapoor: 'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
Jeetendra Nephew Award Winning Director: एकता कपूरचा भाऊ 'हा' अवॉर्ड विनिंग डायरेक्टर, अभिनयात ठरला फ्लॉप, मग बनवली सुपरहिट 'कल्ट क्लासिक फिल्म', ओळखलं का कोण?
एकता कपूरचा भाऊ 'हा' अवॉर्ड विनिंग डायरेक्टर, अभिनयात ठरला फ्लॉप, मग बनवली सुपरहिट 'कल्ट क्लासिक फिल्म', ओळखलं का कोण?
Salman Khan Ramayan: सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार; सूत्रांची माहिती
Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार; सूत्रांची माहिती
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Nikita Rawal Angry On Ranbir Kapoor: 'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Manoj Jarange Patil and Pravin darekar: फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
Embed widget