एक्स्प्लोर

Tula Pahta Trailer: तरल प्रेमाची अनवट कहाणी, दोन पिढ्यांची प्रेमकहाणी; मनाला भिडणाऱ्या 'तुला पाहता' सिनेमाचा ट्रेलर पाहिलात?

Tula Pahta Trailer: ऐन तारुण्यात, प्रेमात आकंठ बुडालेले असताना तो अचानक तिच्या आयुष्यातून निघून जातो आणि काही वर्षांनी तसाच अचानक परततो, अन्... 'तुला पाहता' सिनेमाचा ट्रेलर पाहिलात?

Tula Pahta Trailer: आजवर प्रेमकथा असलेल्या चित्रपटात एक प्रेमकहाणी दाखवली गेली. मात्र, 'तुला पाहता' (Tula Pahta) या चित्रपटातून  1971 आणि 2026  या दोन काळांतील दोन प्रेमकहाण्या उलगडण्यात येणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सुप्रसिद्ध अभिनेते मुश्ताफ खान (Actor Mushtaq Khan) यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात मुंबई इथे संपन्न झाला. या प्रसंगी सिनेपोलिसचे हेड ऑफ डिपार्टमेंट - प्रोग्रामिंग आणि डिस्ट्रिब्युशन मयांक श्रॉफ, सुप्रसिद्ध अभिनेता सुशांत शेलार (Actor Sushant Shelar) आणि सिनेमाची संपूर्ण टीम आवर्जून उपस्थित होती. येत्या 10 जुलैला हा सिनेमा मराठी आणि हिंदी भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.

ब्रेव्ह व्हील प्रॉडक्शन्सच्या मयुरा प्रधान यांनी 'तुला पाहता' (Tula Pahta Marathi Movie) या सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमाचं लेखन, दिग्दर्शन मयुरा प्रधान यांचंच आहे. त्यामुळे त्यांनी पहिल्याच सिनेमासाठी तिहेरी जबाबदारी निभावली आहे.  पुष्कर झोटिंग यांनी छायांकन, रोहित प्रधान यांनी ध्वनि आरेखन, रोहन प्रधान, रोहन गोखले यांनी संगीत दिग्दर्शन, तर दीपाली विचारे यांनी नृत्य दिग्दर्शनाद्वारे साथ दिली आहे. चित्रपटात सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते  सतीश पुळेकर, सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री इला भाटे यांच्यासह नचिकेत लेले, मानसी पाटील, निशिगंधा वाड, आनंद काळे, दीपाली विचारे, पल्लवी अजय, स्वप्नील परजाणे, आकाश शिंदे अशी उत्तम स्टारकास्ट आहे. नव्या-जुन्या पिढीच्या कलाकारांचा दर्जेदार अभिनय या सिनेमातून पाहता येणार आहे.

'तुला पाहता' हे सिनेमाचं टायटल मला खूप आवडलं, सिनेमाचा ट्रेलर अतिशय सुंदर आणि मनाला भावणारा आहे. माझ्याकडून या सिनेमाला मनःपूर्वक शुभेच्छा, असं अभिनेते मुश्ताफ खान यांनी सांगितलंय.

ऐन तारुण्यात, प्रेमात आकंठ बुडालेले असताना तो अचानक तिच्या आयुष्यातून निघून जातो आणि काही वर्षांनी तसाच अचानक परततो तो निवृत्त लष्करी अधिकारी म्हणून... त्याच्या अचानक जाण्यानं आणि पुन्हा परतण्यानं तिच्या आयुष्यात काय खळबळ उडते, त्याची तरल कहाणी या सिनेमातून आपल्याला पहायला मिळणार आहे. त्याशिवाय आताच्या काळातील एका तरुण जोडप्याची प्रेमकथा 'तुला पाहता' या सिनेमातून उलगडणार आहे. प्रेमकथा, नातेसंबंध, एकत्र कुटुंब असे अनेक पदर या चित्रपटातील कथानकाला आहेत. त्यामुळेच अत्यंत हळवी कथा, सुखद संगीत, उत्तम अभिनय, संवेदनशील लेखन या चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे.

चित्रपटाच्या टीजरला, गाण्याला रसिक प्रेक्षकांचा   उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आता लाँच करण्यात आलेल्या ट्रेलरमधूनही  या चित्रपटाविषयी अधिकच  उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे 10 जुलैला  प्रदर्शित होणारा 'तुला पाहता' सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहण्याचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे.

'तुला पाहता' मराठी सिनेमाचा ट्रेलर पाहिलात?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Advertisement

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget