एक्स्प्लोर

Trisha Krishnan : 'खट्टा-मीठा'नंतर 13 वर्षांनी अभिनेत्री तृषा बॉलिवूडमध्ये परतणार, सलमानसोबत शेअर करणार स्क्रीन 

Trisha Krishnan : अभिनेत्री तृषा ही टॉलीवुडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या दोन दशकांपासून तृषाने अनेक हिट सिनेमे केले आहेत. तिने टॉलीवुडमधील सर्वच दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम केलं आहे.

Trisha Krishnan : अभिनेत्री तृषा ही टॉलीवुडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या दोन दशकांपासून तृषाने अनेक हिट सिनेमे केले आहेत. तिने टॉलीवुडमधील सर्वच दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम केलं आहे. 13 वर्षांपूर्वी बॉलीवुडच्या 'खट्टा-मीठा' या सिनेमामध्ये तृषा अभिनेता अक्षय कुमारबरोबर प्रमुख भूमिकेत होती. त्यानंतर तिने बॉलीवूडमध्ये कोणताच सिनेमा केली नाही. दरम्यान आता तब्बल 13 वर्षांनी ती बॉलिवुडमध्ये परतणार आहे. या सिनेमात ती बॉलीवुड अभिनेता सलमान खानबरोबर (Salman Khan) स्क्रीन शेअर करताना दिसेल. मीडिया रिपोर्ट्नुसार, तृषा दिग्दर्शक विष्णू वर्धन यांच्या पुढील सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. विष्णू वर्धन यांच्या या सिनेमात सलमान खानचीही भूमिका असणार आहे. लवकरच या सिनेमाची घोषणा होण्याची शक्यता आहे. 

खट्टा मिठ्ठामधून बॉलीवुडमध्ये पदार्पण (Trisha Krishnan)

तृषाने 2010 मध्ये प्रियदर्शन निर्मित खट्टा-मीठा या सिनेमाच्या माध्यमातून (Trisha Krishnan) हिने बॉलीवुडमध्ये पदार्पण केले होते. तिने अक्षय कुमारसमवेत मुख्य भूमिका साकारली होती. कॉमेडी आणि राजकारण हे या चित्रपटाचा केंद्रबिंदू होते. या सिनेमाने प्रेक्षकांना पोट भरून हसवले. अक्षय कुमार आणि तृषा शिवाय राजपाल यादव आणि जॉनी लिवर यांनीही आपल्या भूमिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. दरम्यान, आता तृषा पुन्हा एकदा बॉलीवुडमध्ये हिट सिनेमा करण्याच्या मनसुब्याने परतत आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये तृषाने आजवर आपल्या उक्तृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'लिओ' या सिनेमाने बंपर कमाई केली आहे. 
 

तृषाच्या कोणत्या सिनेमांचे शूटींग सुरु?

सध्याच्या घडीला तृषा दाक्षिणात्या सिनेमांच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. ती तामिळ भाषेतील एका सिनेमाच्या काम करताना दिसणार आहे. विद्यामुयार्ची या तमिळ आणि आयडेंटिटी या मल्याळम भाषेतील सिनेमाचे सध्या तृषा शूट करत आहे. सध्या एकाच वेळी दोन्ही सिनेमांचे शूटींग सुरु आहे. यानंतर ती मणिरत्नम यांच्या 'ठग लाइफ' या सिनेमाच्या शूटींगसाठी रवाना होणार आहे. या सिनेमामध्ये दिग्गज अभिनेते कमल हसन यांच्यासमवेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. कलम हसन यांचा हा चित्रपट 2024 मध्ये रिलीज होईल. टॉलीवुड शिवाय हिंदी सिनेमामध्येही तृषाचा मोठा चाहता वर्ग आहे. चाहते तिच्या हिंदी भाषेतील सिनेमाची आतुरतेने वाट पाहात आहेत. शिवाय, सलमान खानसोबत काम करण्यासाठी तृषाही उत्सुक आहे. सलमान-तृषाच्या नव्या सिनेमाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

Salman Khan Birthday: "टायगर, टायगर, टायगर"; सलमानच्या वाढदिवसानिमित्त कतरिनाची खास पोस्ट

 

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress Disco Shanti: 14 वर्षांत 900 फिल्म्स, पोटची लेक गमावली, पतीच्या निधनानं बदललं आयुष्य, आता 61व्या वर्षी कमबॅक करण्याच्या तयारीत 'डिस्को शांती', ओळखलं का कोण?
14 वर्षांत 900 सिनेमांत काम, लेकीला गमावलं, पतीच्या निधनानंतर आयुष्य बदललं; 61 व्या वर्षी 'डिस्को शांती' करणार कमबॅक, ओळखलं का कोण?
Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget