एक्स्प्लोर

Sunny Deol On Pakistan: 'भारत माझी आई, पाकिस्तान माझी मावशी...'; 'बंटवारा 1947'च्या प्रमोशनवेळचं सनी देओलचं वक्तव्य चर्चेत

Sunny Deol On Pakistan: सनी देओल आपल्या 'बटवारा 1947' सिनेमाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये माध्यमांशी संवाद साधला. त्यांना सिनेमाच्या शुटिंगपासून ते पाकिस्तानपर्यंतच्या विविध विषयांवर भाष्य करण्यास सांगण्यात आलं, पण त्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला.

Sunny Deol On Pakistan: बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सनी देओलचा (Sunny Deol) आगामी सिनेमा 'बंटवारा 1947' (Bantwara 1947) अनाउंस झाल्यापासूनच चर्चेत आहे. अलिकडेच एका कार्यक्रमादरम्यान, पाकिस्तानशी संबंधित प्रश्नावर भाष्य करणं टाळणंच सनी देओलनं योग्य मानलंय. रविवारी सिनेमाच्या प्रमोशनसाठी (Bantwara 1947 Promotional Event) सनी देओल पाटण्यात आलेला, त्यावेळी एका पत्रकारानं त्याला पाकिस्तानमधील (Pakistan) सध्याच्या परिस्थितीवर प्रतिक्रिया देण्यास सांगितलं, तेव्हा सनी देओलनं सावध पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं.

दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Director Rajkumar Santoshi) यांचा 'बटवारा 1947' हा फाळणीनंतरच्या काळातील पार्श्वभूमीवर आधारित एक इमोशनल सिनेमा (Emotional Cinema) असून, तो 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. सनी देओल आपला मुलगा करण देओल याच्यासोबत सिनेमाचा जोरदार प्रचार करतोय, याच मोहिमेचा भाग म्हणून त्यानं नुकतीच बिहारची राजधानी पाटणा इथे भेट दिली आणि तिथे माध्यमांशी संवादही साधला. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सनी देओलनं दिली माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं (Sunny Deol Comment On Pakistan)

सनी देओलनं त्याच्या 'बंटवारा 1947' (Bantwara 1947) सिनेमाच्या पत्रकार परिषदेदरम्यान माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. जेव्हा त्याला पाकिस्तानबद्दल भाष्य करण्यास सांगण्यात आलं, तेव्हा त्यानं तसं करण्यास नकार दिला. सनी देओलनं स्पष्ट केलं की, तो एक स्टोरीटेलर आहे आणि त्याला अजिबातच राजकारणात पडायचं नाही.

पाकिस्तानबद्दल बोलताना 68 वर्षांचा अभिनेता म्हणाला की, "बघा, मला त्या सर्व गोष्टींच्या खोलात जायचं नाही, आम्ही कलाकार आहोत, आम्ही सिनेमे बनवतो. आम्ही कथा निवडतो आणि त्यातून आशय मांडतो. आम्ही त्या गोष्टींचं राजकारण करत नाही, आणि आम्हाला ते करायचंही नाही. म्हणूनच मी त्या विषयावर (पाकिस्तानवर) बोलणार नाही..."

बाबा म्हणायचे, भारत ही माझी आई आणि पाकिस्तान ही माझी मावशी... : सनी देओल 

सनी देओलला माध्यमांनी विचारलं की, भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीवर आधारित असलेल्या या सिनेमाचं शुटिंग शेजारच्या देशात झालेलं का? यावर स्पष्टीकरण देताना तो म्हणाला, "नाही, याचं शुटिंग तिथे (पाकिस्तानमध्ये) झालेलं नाही, हा सिनेमा पूर्णपणे भारतातच शूट करण्यात आलाय. आम्ही अशा भावनांचा अतिविचार करत नाही, कारण संपूर्ण राष्ट्र एकेकाळी एकच होतं. माझे वडील नेहमी म्हणायचे, "भारत ही माझी आई आहे आणि पाकिस्तान ही माझी मावशी आहे..." तुम्हाला हे सर्व माहीतच आहे. जरी आपण सध्या एकमेकांशी जोडलेले नसलो, तरी मुळात आपण एकच आहोत..."

दरम्यान, 'पार्टिशन: 1947' (Partition: 1947) सिनेमाबद्दल बोलायचं तर, बॉलिवूडची डिम्पल गर्ल प्रिती झिंटा रुपेरी पडद्यावर कमबॅक करतेय. त्याव्यतिरिक्त या सिनेमात शबाना आझमी, अली फजल आणि अभिमन्यू सिंह यांसारखे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunny Deol On Pakistan: 'भारत माझी आई, पाकिस्तान माझी मावशी...'; 'बंटवारा 1947'च्या प्रमोशनवेळचं सनी देओलचं वक्तव्य चर्चेत
'भारत माझी आई, पाकिस्तान माझी मावशी...'; 'बंटवारा 1947'च्या प्रमोशनवेळचं सनी देओलचं वक्तव्य चर्चेत
Shalmali Kholgade On Marriage With Farhan Shaikh: शाल्मली खोलगडे मुस्लीम नवरा केल्यामुळे झालेली ट्रोल, लव्ह जिहादच्या आरोपांवर अखेर सोडलं मौन; म्हणाली, 'प्रॉब्लेम फक्त समाजाला...'
शाल्मली खोलगडे मुस्लीम नवरा केल्यामुळे झालेली ट्रोल, लव्ह जिहादच्या आरोपांवर अखेर सोडलं मौन; म्हणाली, 'प्रॉब्लेम फक्त समाजाला...'
Kushal Badrike On Female Character In Chala Hawa Yeu Dya: 'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; 'चला हवा येऊ द्या'बाबत नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Manoj Jarange on Pankaja Munde Dhananjay Munde: पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
Kushal Badrike On Female Character In Chala Hawa Yeu Dya: 'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; 'चला हवा येऊ द्या'बाबत नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: स्वत:च्या प्रसिद्धीसाठी विधान, आम्ही निषेध करतो, आमच्या घरी या...; सावजी हॉटेल चालक संतापले, तुकाराम मुंढेंना काय काय म्हणाले?
स्वत:च्या प्रसिद्धीसाठी विधान, आम्ही निषेध करतो, आमच्या घरी या...; सावजी हॉटेल चालक संतापले, तुकाराम मुंढेंना काय काय म्हणाले?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Embed widget