Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर एकटाच 'स्पायडर-मॅन' भारी! विजय थलपती, अजय देवगण आणि नोलन यांच्या चित्रपटांनी किती कमावले?
थलपती विजयच्या 'जननायकन', ख्रिस्टोफर नोलनच्या 'द ओडिसी' आणि अजय देवगणच्या 'धमाल 4'च्या कमाईतही घट झाली.

Monday Box Office Collection: रविवारी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणाऱ्या चित्रपटांना सोमवारी मात्र वीकडेजचा फटका बसला. जवळपास सगळ्याच चित्रपटांच्या कमाईत घसरण झाली. तरीही 'स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे'नं मंडे टेस्टमध्येही पहिला नंबर कायम ठेवला. तर थलपती विजयच्या 'जननायकन', ख्रिस्टोफर नोलनच्या 'द ओडिसी' आणि अजय देवगणच्या 'धमाल 4'च्या कमाईतही घट झाली. जाणून घेऊया 'जना नायकन', 'द ओडिसी' आणि 'धमाल 4'चं कलेक्शन..(Box Office Collection)
'स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा
'स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे' भारतीय बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. ओपनिंग वीकेंडला या चित्रपटाने विक्रमी कलेक्शन केलं. वीकडे सुरू झाल्याने कमाईत सोमवारी कमाईत काहीशी घसरण झाली असली तरी सर्वाधिक कमाई याच चित्रपटाने केली.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्या सोमवारी 16,851 शोमधून 23.80 कोटी रुपयांची नेट कमाई केली. यासह भारतातील पाच दिवसांची एकूण नेट कमाई 281.75 कोटी रुपये झाली आहे.
'जननायकन'ने किती कमावले?
थलपती विजयच्या 'जननायकन'च्या कमाईत दुसऱ्या सोमवारी (12व्या दिवशी) मोठी घट झाली. चित्रपटाने 3,943 शोमधून 3.85 कोटी रुपयांची नेट कमाई केली.
भारतात या चित्रपटाने एकूण ग्रॉस कमाई 209.35 कोटी रुपये, तर नेट कमाई 179.45 कोटी रुपये कमावले आहेत. परदेशात 12व्या दिवशी चित्रपटाने 1 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं असून एकूण ओव्हरसीज ग्रॉस कलेक्शन 92 कोटी रुपये झाले आहे. त्यामुळे जगभरातील एकूण ग्रॉस कलेक्शन 301.35 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
'द ओडिसी'ने तिसऱ्या सोमवारी किती कमाई केली?
दिग्दर्शक ख्रिस्टोफर नोलन यांच्या 'द ओडिसी'ने भारतीय बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केलीय. मात्र, 'स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे' प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाच्या कमाईचा वेग काहीसा मंदावला आहे.
सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, प्रदर्शित झाल्यानंतरच्या 18व्या दिवशी (तिसऱ्या सोमवारी) द ओडिसी चित्रपटाने 2.36 कोटी रुपये कमावले. यासह भारतातील एकूण नेट कलेक्शन 151.85 कोटी रुपये झाले आहे.
'धमाल 4'ची चौथ्या सोमवारी किती कमाई?
अजय देवगणचा 'धमाल 4' नव्या चित्रपटांच्या स्पर्धेतही दमदार कमाई करत आहे. चौथ्या विकेंडमध्ये चित्रपटाने शनिवारी 1.65 कोटी रुपये, तर रविवारी 2.35 कोटी रुपये कमावले. मात्र, चौथ्या सोमवारी कमाईत पुन्हा घट झाली आणि चित्रपटाची कमाई लाखांमध्ये आली. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, चित्रपटाने 60 लाख रुपयांची कमाई केली. यासह भारतातील 25 दिवसांची एकूण कमाई 161.65 कोटी रुपये झाली आहे.





















