एक्स्प्लोर

अमोल कोल्हेंच्या 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचा प्रयोग सुप्रिया सुळेंनी पाहिला; पोस्ट शेअर करत म्हणाल्या, 'अतिशय मोलाचे काम...'

'शिवपुत्र संभाजी' (Shivputra Sambhaji) हे महानाट्य पाहिल्यानंतर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एक खास पोस्ट शेअर करुन या महानाट्याच्या टीमचे कौतुक केले आहे. 

Amol Kolhe :  डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे सध्या 'शिवपुत्र संभाजी' (Shivputra Sambhaji) या महानाट्यामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. अमोल कोल्हे हे या महानाट्याचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात करत आहेत. नुकताच 'शिवपुत्र संभाजी'  या महानाट्याचा प्रयोग पिंपरी चिंचवड येथे  पार पडला. या प्रयोगाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी हजेरी लावली. 'शिवपुत्र संभाजी' हे महानाट्य पाहिल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी एक खास पोस्ट शेअर करुन या महानाट्याच्या टीमचे कौतुक केले आहे. 

सुप्रिया सुळे यांची पोस्ट

सुप्रिया सुळे यांनी 'शिवपुत्र संभाजी'  या महानाट्याचा प्रयोग पाहिल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं,  'स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारीत 'शिवपुत्र संभाजी ' या महानाट्याचा प्रयोग पिंपरी चिंचवड येथे पाहिला. हा अतिशय दर्जेदार असा कार्यक्रम आहे. खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी या महानाट्याच्या माध्यमातून अतिशय मोलाचे काम केले आहे. याबद्दल त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. आपणही हे महानाट्य अवश्य पहा.याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय जगताप व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.'

View this post on Instagram
 
A post shared by Supriya Sule (@supriyasule)

अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सुप्रिया सुळे यांचे आभार मानले आहेत. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, 'पिंपरी चिंचवड येथील शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या आजच्या प्रयोगास राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गदर्शक खासदार सुप्रियाताई सुळे यांची सन्माननीय उपस्थिती! खूप खूप धन्यवाद'

View this post on Instagram
 
A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

पिंपरी-चिंचवड शहरातील एचए मैदानावर 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचं सादरीकरण सुरु आहे. या महानाट्याचा मोफत पास मिळावा म्हणून पिंपरी पोलिसांनी धमकी दिल्याचा आरोप डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केला होता. याबाबत सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली होती.

संबंधित बातम्या

Supriya Sule :  अमोल कोल्हेंबरोबर घडलेल्या प्रकाराबाबत सुप्रिया सुळेंची नाराजी; म्हणाल्या...

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget