एक्स्प्लोर

Drugs Case | ड्रग्ज खरेदी करताना टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहानला एनसीबीने रंगेहाथ पकडलं!

एनसीबीने छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रीतिका चौहानला अटक केली आहे. प्रीतिकाला ड्रग पेडलर फैझल याच्याकडून ड्रग्ज घेताना रंगेहाथ बेड्या ठोकल्या. या दोघांनाही 5 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर अॅक्शन मोडमध्ये आलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रीतिका चौहानला अटक केली आहे. प्रीतिका चौहानला ड्रग पेडलर फैझल याच्याकडून ड्रग्ज घेताना रंगेहाथ बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. एका अधिकाऱ्याने रविवारी (25 ऑक्टोबर) ही माहिती दिली. या दोघांनाही 5 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रीतिकाने जामीनासाठी अर्ज केला असून आज त्यावर सुनावणी होणार आहे. तसंच एनसीबीला दिलेला जबाब तिने फिरवला आहे.

अंमली पदार्थांच्या सौद्याबाबत माहिती मिळाल्यानंतर एनसीबी-मुंबई झोनल युनिटच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी रात्री वर्सोव्यातून दोघांना पकडलं. त्यांच्याकडून 99 ग्राम 'मारिजुआना' जप्त करण्यात आलं. या दोघांनी कथितरित्या वर्सोव्यात राहणाऱ्या दीपक राठोडकडून हे ड्रग घेतल्याची कबुली दिली. एनसीबीने अटक केलेल्या दोघांना कोर्टात हजर असता त्यांना 5 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान एनसीबीचे अधिकारी साध्या कपड्यांमध्ये मुंबईच्या वर्सोवामधील दोन ठिकाणी देले होते. एनसीबीच्या पथकाने पाच जणांना अटक केली असून ऑपरेशन अजून सुरु आहे

मूळची हिमाचल प्रदेशची असलेली 30 वर्षीय प्रीतिका चौहान ही छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आहे. मागील पाच वर्षात तिने सीआयडी, सावधान इंडिया, संकटमोचन महाबली हनुमान आणि देवों के देव महादेव यासह अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे.

दुसऱ्या एका कारवाईत एनसीबी अधिकाऱ्यांनी शनिवार रात्री उशिरा मशिद बंदर स्टेशनजवळून टांझानियाच्या नागरिकाला4 ग्राम कोकेनसह अटक केली. आरोपी ब्रूनो जॉन नगवालेच्या चौकशीनंतर वर्सोवातील एका परिसरात छापा टाकण्यात आला. यामध्ये 4.40 ग्रॅम 'एक्सटसी' आणि 1.88 ग्रॅम एमडीएमए जप्त करण्यात आलं.

वर्सोवातून रोहित हिरे नावाच्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे. एका वाहनातून 325 ग्रॅम 'गांजा', 32 ग्रॅम 'चरस' आणि 5 ग्राम मेथम्फेटामाईनसह 12 हजार 990 रुपये जप्त करण्यात आले.

अनेक अभिनेत्रींचीही एनसीबीकडून चौकशी दरम्यान ड्रग्ज अँगलमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती महिनाभर जेलमध्ये होती. ती सध्या जामीनावर बाहेर आहे. याशिवाय अनेक जण अजूनही तुरुंगात आहेत. याशिवाय दीपिका पादुकोण, रकुलप्रीत सिंह, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर या अभिनेत्रींनी एनसीबीने या प्रकरणात चौकशी केली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nida Khan Nashik Physical Harassment Case: नाशिकमधील महिला अत्याचार धर्मांतर प्रकरणात मोठा ट्वि्स्ट, निदा खान मुख्य सूत्रधार, हादरवणारी माहिती समोर
नाशिकमधील महिला अत्याचार धर्मांतर प्रकरणात मोठा ट्वि्स्ट, निदा खान मुख्य सूत्रधार, हादरवणारी माहिती समोर
Nari Shakti Vandan Act Women Reservation Bill: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nida Khan Nashik Physical Harassment Case: नाशिकमधील महिला अत्याचार धर्मांतर प्रकरणात मोठा ट्वि्स्ट, निदा खान मुख्य सूत्रधार, हादरवणारी माहिती समोर
नाशिकमधील महिला अत्याचार धर्मांतर प्रकरणात मोठा ट्वि्स्ट, निदा खान मुख्य सूत्रधार, हादरवणारी माहिती समोर
Nari Shakti Vandan Act Women Reservation Bill: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
Pooja Sawant On Women Safety: '...तर कोणत्याही स्त्रीला हात लावण्यापूर्वी तो दहावेळा विचार करेल'; मराठी अभिनेत्रीनं बोलून दाखवली कायदे कडक करण्याची गरज, ॲनिमल क्रुएल्टीबाबत म्हणाली...
'...तर कोणत्याही स्त्रीला हात लावण्यापूर्वी तो दहावेळा विचार करेल'; मराठी अभिनेत्रीनं बोलून दाखवली कायदे कडक करण्याची गरज
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
Embed widget