एक्स्प्लोर

Akhil Bhartiya Marathi Natya Parishad: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी; प्रसाद कांबळी की प्रशांत दामले, कोणाचं पॅनल ठरणार विजयी?

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad) पंचवार्षिक निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया उद्या (16 एप्रिल) पार पडणार आहे.

Akhil Bhartiya Marathi Natya Parishad : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad) पंचवार्षिक निवडणूक पार पडत आहेत. उद्या (16 एप्रिल) निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत प्रसाद कांबळी (Prasad Kambli) आणि प्रशांत दामले ( Prashant Damle) या दोघांच्या पॅनलपैकी कोणते पॅनल विजयी ठरेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही पॅनल्सकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.  

'रंगकर्मी नाटक समूह' पॅनल

प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूह या पॅनलमध्ये अनेक दिग्गज कलाकार आहेत. या पॅनलमध्ये विजय केंकरे, अजित भुरे, सयाजी शिंदे, विजय गोखले, वैजयंती आपटे, सुशांत शेलार, सविता मालपेकर यांचा समावेश आहे. प्रशांत दामले यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या रंगकर्मी नाटक समूह या पॅनलची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली होती. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं, 'छान करायच मनात आहे. आपण जर नाट्य परिषदेचे सभासद असाल कृपया 16 एप्रिल आमच्यासाठी राखून ठेवा. तुमची साथ हवीच.'

प्रसाद कांबळी यांचं 'आपलं पॅनल'

प्रसाद कांबळी यांच्या पॅनलमध्ये सुकन्या मोने, मंगेश कदम, राजन भिसे, ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर, अशोक नारकर, संतोष काणेकर, सुनील देवळेकर, दिगंबर प्रभू, राजन भिसे यांचा समावेश आहे. या पॅनलचं नाव 'आपलं पॅनल' असं आहे. सुकन्या मोने यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून 'आपलं पॅनल' या पॅनचा प्रचार केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, 'नाट्य क्षेत्रातील पडद्यापुढील, पडद्यामागील अशा सर्वांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आणि अ. भा. म. ना. परिषदेला मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी 'आपलं पॅनल' सज्ज आहे.'

View this post on Instagram
 
A post shared by Aapla Panel (@aapla_panel)

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकांचे मतदान केंद्र हे माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिर आणि गिरगांव येखील साहित्य संघ मंदिर हे असणार आहे. रविवारी (16 एप्रिल) सकाळी 9 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होईल. 

लॉकडाऊनच्या काळात अनेक नाट्यकर्मींना, नाट्यसंस्थांना मोठा आर्थिक फटका बसला. याच आर्थिक फटक्याला अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेला देखील सामोरे जावे लागले आहे. गेल्या अनेक वर्षांत नाट्यपरिषद आणि वाद हे न संपणारे समीकरण झाले होते. कोरोनाकाळात तर हे प्रकरण आणखीनच गंभीर वळणावर पोहोचले आहे. कोरोनाकाळात अचानक टाळेबंदी झाली आणि नाट्यगृहाचा पडदादेखील बंद करण्यात आला. तेव्हा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुढे सरसावली होती. अनेक रंगकर्मींना निधी वाटण्याचे काम परिषदेतर्फे करण्यात आले होते. 

 इतर महत्वाच्या बातम्या:

Natya Parishad : नाट्य परिषद आणि न संपणारे वाद, आमचं काम घटनेच्या चौकटीत - प्रसाद कांबळी

महत्त्वाच्या बातम्या

EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Embed widget