एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Dharashiv : नळदुर्ग नगरीत खंडोबा-बाणाई विवाह सोहळ्याचे औचित्य, "नळदुर्ग नगरी हळदीने माखली " गीत प्रसारीत

Dharashiv :  खंडोबा हे महादेवाचा अवतार मानले जातात आणि महाराष्ट्रात त्यांची 8 प्रमुख स्थाने आहेत.

धाराशिव : महाराष्ट्राचे आराध्यदैवत खंडोबा आणि बाणाई यांच्या विवाह सोहळ्यावर आधारित एक नवे गीत नुकतेच प्रसारीत  झाले आहे. "नळदुर्ग नगरी हळदीने माखली " असे या गीताचे सुरेख बोल असून, हे गीत गीतकार-पत्रकार सुनील ढेपे यांनी लिहिले आहे. या गीताला प्रसिद्ध संगीतकार सचिन अवघडे यांनी संगीतबद्ध केले असून, गायक संदीप रोकडे यांनी ते आपल्या सुमधुर आवाजात गायले आहे.

 खंडोबा हे महादेवाचा अवतार मानले जातात आणि महाराष्ट्रात त्यांची 8 प्रमुख स्थाने आहेत. त्यापैकी अणदूर-मैलारपूर (नळदुर्ग) हे एक अत्यंत महत्त्वाचे स्थान म्हणून ओळखले जाते. दमयंती राणीच्या भक्तीने प्रसन्न होऊन खंडोबा नळदुर्ग येथे प्रकट झाले, तसेच दमयंती राणीच्या भक्तीमुळे खंडोबाने आपला दुसरा विवाह बाणाईशी या ठिकाणी केल्याची आख्यायिका आहे.

असे म्हणतात की खंडोबा-बाणाई यांच्या विवाह सोहळ्याला स्वतः ब्रह्मा, विष्णू, लक्ष्मी, सरस्वती, श्री गणेश यांच्यासह तब्बल ३३ कोटी देव उपस्थित होते! या विवाह सोहळ्यात नारद मुनींनी अक्षता म्हटल्या होत्या. हे नवे गीत खंडोबा आणि बाणाई यांच्या या अलौकिक विवाह सोहळ्याचे सुरेख वर्णन करते. "नळदुर्ग नगरी हळदीने माखली, खंडोबा झालाय पिवळा, बाणाई - खंडोबाच्या लग्नाला, तेहतीस कोटी देव झाले गोळा" अशा ओळींमधून या गीतातून त्यांच्या विवाहाचे चित्र रेखाटले आहे. हे गीत भाविकांमध्ये झपाट्याने लोकप्रिय होत आहे आणि खंडोबाच्या भक्तीचा एक नवा आयाम निर्माण करत आहे.

या गीताच्या माध्यमातून सुनील ढेपे, सचिन अवघडे आणि संदीप रोकडे यांनी खंडोबा भक्तांना एक अनमोल भेट दिली आहे. हे गीत ऐकून भाविकांना नक्कीच आध्यात्मिक आनंद मिळेल.

हे गीत कुठे ऐकाल ?

युट्युबवर मुक्तरंग म्युझिक चॅनलवर हे गीत प्रसारित करण्यात आले आहे तसेच Wynk, Hungama, JioSaavn, Gaana, Spotify, Instagram Music, Facebook Music, Resso, Amazon Prime Music, Apple Music, Itunes या सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

ही बातमी वाचा : 

Rinku Rajguru : लाडक्या आर्चीचा नवा सिनेमा, रिंकु राजगुरु साकारणार 'ही' ऐतिहासिक भूमिका?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut VS Raosaheb Danve : संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं, दानवेंची राऊतांवर टीका #abpमाझाSanjay Raut VS Bawankule : शपथविधीचे अधिकार बावनकुळेंना दिलेत का? राऊतांचा बावनकुळेंना सवालMaharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 7 PM : 01 डिसेंबर 2024 : ABP MajhaRohit Patil Update : रोहित पाटील यांची शरद पवार पक्षाच्या मुख्य प्रतोद पदी नियुक्ती #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
Embed widget