The Kashmir Files : ‘शूटिंग दरम्यान नैराश्यात गेलो’, अभिनेता दर्शन कुमारने सांगितला चित्रीकरणाचा अनुभव!
Darshan Kumar : अभिनेता दर्शन कुमारने अलीकडेच एका मुलाखतीत ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाविषयीचा त्याचा अनुभव शेअर केला आहे.
Darshan Kumar : 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) रिलीज होऊन आता 6 दिवस झाले आहेत, पण अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. कश्मीर फाइल्स आता 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी अवघी काही पावले मागे आहे. चहुबाजूंनी वाहवा मिळवणाऱ्या या चित्रपटातील प्रत्येक पात्राच्या मेहनतीचे जोरदार कौतुक होत आहे. अनुपम खेरपासून (Anupam Kher) ते पल्लवी जोशीपर्यंत (Pallavi Joshi) या चित्रपटातील प्रत्येक पात्रांचा अभिनय अंगावर शहारे आणणारा आहे. या चित्रपटात ‘कृष्णा पंडित’च्या भूमिकेत दिसलेल्या अभिनेता दर्शन कुमारच्या (Darshan Kumar) अभिनयाचेही कौतुक होत आहे.
अभिनेता दर्शन कुमारने अलीकडेच एका मुलाखतीत ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाविषयीचा त्याचा अनुभव शेअर केला आहे. बॉलिवूड लाईफशी बोलताना दर्शन कुमारने त्याला चित्रपटात काम कसे मिळाले आणि त्यांचा अनुभव कसा होता, याबद्दल सांगितले.
सत्य समोर यावे असे वाटले!
भूमिका करण्याचा निर्णय कसा घेतला याविषयी सांगताना दर्शन म्हणतो की, 'मला प्रथम दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सर आणि पल्लवी मॅडम यांनी खऱ्या पीडितांचा व्हिडीओ दाखवला, जेणेकरून मला गोष्टी समजू शकतील.' दर्शनने मुलाखतीदरम्यान सांगितले की, 'व्हिडीओमधील लोकांच्या वेदना पाहिल्यानंतर, त्यांचे हे नेहमीच दबून राहिलेले सत्य समोर यावे असे वाटले आणि मी ही भूमिका करण्याचा निर्णय घेतला.'
त्या पात्रातून बाहेर पडताना त्रास झाला!
दर्शन कुमारने मुलाखतीत सांगितले की, या भूमिकेचा त्याच्यावर इतका भावनिक प्रभाव पडला होता की, तो डिप्रेशनमध्ये गेला. या नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने सुमारे दोन आठवडे ध्यानधारणा केली. अभिनेता म्हणाला, 'जेव्हा लोक चित्रपट पाहून थिएटरमधून बाहेर पडत होते, तेव्हा ते भावनांवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत आणि रडत बाहेर आले, पण मी 40 दिवस ते पात्र जगलो.' दर्शन कुमार या मुलाखतीत बोलताना म्हणाला की, हे खूप वेदनादायक होते, आतापर्यंतच्या आयुष्यात त्याने साकारलेल्या सर्व पात्रांपैकी हे सर्वात कठीण पात्र आहे.
संबंधित बातम्या
- The Kashmir Files : ‘सत्य समोर आणणारे असे आणखी चित्रपट बनले पाहिजेत’, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘द काश्मीर फाईल्स’चे कौतुक!
- The Kashmir Files Box Office Collection Day 6 : ‘द कश्मीर फाइल्स’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! सहाव्या दिवशी जमवला ‘इतका’ गल्ला!
- The Kashmir Files : बॉक्स ऑफिसवरील यशानंतर आता 'द कश्मीर फाइल्स' ओटीटीवर; 'या' प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha