Film Created History: 8 दिवसांत शुटिंग पूर्ण, 49 लाखांचं बजेट आणि 20 हजार कोटींची कमाई; 'ती' हॉरर फिल्म जिनं रचला इतिहास
Film Created History: 'द ब्लेअर विच प्रोजेक्ट' हा 1999 चा अमेरिकन अलौकिक हॉरर चित्रपट आहे, जो डॅनियल मायरिक आणि एडुआर्डो सांचेझ यांनी दिग्दर्शित केला होता.

Film Created History: बॉलिवूड (Bollywood), हॉलिवूडमध्ये (Hollywood) आजवर वेगवेगळ्या जॉनरचे अनेक सिनेमे प्रदर्शित झाले. काही कॉमेडी (Comedy Movie), काही क्राईम-थ्रीलर (Crime-Thriller Movie), काही सस्पेन्सनं भरलेले... तर काही हादरवणारे हॉरर सिनेमे (Horror Movies). काही सिनेमे तर अगदी अंगावर शहारे आणणारे होते. आजही आपण ते एकट्यानं पाहण्याचं धाडस करू शकत नाही. अशाच एका हॉरर सिनेमाबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्याचं नाव आहे, 'द ब्लेअर विच प्रोजेक्ट' (The Blair Witch Project). हा सिनेमा 1999 मध्ये प्रदर्शित झालेला. 'द ब्लेअर विच प्रोजेक्ट' हा 1999 चा अमेरिकन अलौकिक हॉरर चित्रपट आहे, जो डॅनियल मायरिक आणि एडुआर्डो सांचेझ यांनी दिग्दर्शित केला होता.
पॅरानॉर्मल अॅक्टिविटीवर बनलाय 'हा' सिनेमा
'द ब्लेअर विच प्रोजेक्ट' हा पॅरानॉर्मल अॅक्टिविटीवर बनवलेल्या आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. या सिनेमात तीन मित्रांची कथा आहे, जे एका प्रोजेक्टसाठी जातात आणि अत्यंत रहस्यमयी पद्धतीनं गायब होतात. 1 वर्षानंतर जेव्हा या विद्यार्थ्यांचा कॅमेरा सापडतो, तेव्हा त्यांच्यासोबत काय घडलं ते फुटेजमधून स्पष्ट होतं. चित्रपटात हेदर डोनाह्यू, मायकेल विल्यम्स आणि जोशुआ लिओनार्ड हे मुख्य भूमिकेत झळकलेले.
View this post on Instagram
'द ब्लेअर विच प्रोजेक्ट'चं बजेट आणि कलेक्शन किती?
कदाचितच तु्म्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, केवळ 49 लाख रुपयांच्या तुटपुंज्या बजेटमध्ये बनवलेल्या या सिनेमानं जगभरात 20 अब्ज रुपयांची कमाई केलेली. जर तुम्ही अजूनही हा सिनेमा पाहिला नसेल, तर या आठवड्याच्या शेवटी तुम्ही तुमच्या कुटुंबासह हा सिनेमा पाहू शकता. पण, एकट्यानं अजिबात पाहू नका... कुणाला तरी सोबत घेऊन मगच हा सिनेमा पाहा. तुम्ही हा सिनेमा पाहण्याचा विचार करत असाल, तर ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइमवर 'द ब्लेअर विच प्रोजेक्ट' हा हॉरर सिनेमा तुम्ही पाहू शकता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























