एक्स्प्लोर

'काही लोकांना वाटतं सगळ्या मुली त्यांच्यासाठी उपलब्ध'; प्राची पिसाटला लोकप्रिय अभिनेत्रींचा पाठिंबा

Marathi Actress Support To Prachi Pisat: प्राचीला दिग्गज अभिनेत्यानं मेसेज केले होते, तेच त्या शेअर केलेल्या स्क्रिनशॉर्टमध्ये दिसत होते. यामध्ये, 'तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये', असं म्हणत दिग्गज अभिनेत्यानं प्राची पिसाटकडे तिचा नंबर मागितला होता.

Prajakta Dighe and Shilpa Navalkar Support To Prachi Pisat: एकीकडे बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) कास्टिंग काउचबाबत (Casting Couch) उघडपणे बोलत असल्याचं पाहायला मिळतंय. तर, दुसरीकडे मराठी सिनेसृष्टीतही (Marathi Industry) अभिनेत्रींना काही विचित्र अनुभवांचा सामना करावा लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. मराठी इंडस्ट्रीतील प्राची पिसाटनं (Prachi Pisat) सोशल मीडियावर (Social Media) एक स्क्रिनशॉर्ट पोस्ट केला आणि संपूर्ण इंडस्ट्रीत एकच खळबळ माजली.

प्राचीला दिग्गज अभिनेत्यानं मेसेज केले होते, तेच त्या शेअर केलेल्या स्क्रिनशॉर्टमध्ये दिसत होते. यामध्ये, 'तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये', असं म्हणत दिग्गज अभिनेत्यानं प्राची पिसाटकडे तिचा नंबर मागितला होता. तसेच, प्राचीनं अनेक गंभीर आरोपही केले होते. अशातच प्राचीनं स्क्रिनशॉर्ट शेअर केल्यानंतर आता मराठी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्रींनी तिला पाठींबा दिला आहे. 

प्राची पिसाटनं 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेत झळकणारे दिग्गज अभिनेते सुदेश म्हशिलकर (Sudesh Mhashilkar) यांच्या मेसेजचा स्क्रिनशॉर्ट शेअर केलेला. प्राचीनं फेसबुकवर ही पोस्ट शेअर केल्यानंतर, अनेक कमेंट आलेल्या. काहींनी प्राचीची बाजू घेतलेली, तर काहींनी अभिनेते सुदेश म्हशिलकर यांचं अकाउंट हॅक झालं असावं, ते असं करुच शकत नाहीत, असा विश्वास व्यक्त केला. अशातच आता प्राचीला काही लोकप्रिय मराठी अभिनेत्रींनी पाठींबा दिला आहे. 

स्क्रिनशॉर्ट शेअर केल्यानंतर प्राचीनं इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केलीय. तिला ही पोस्ट डिलीट करण्यासाठी दबाव आणण्यात आला, तसेच हा विषय ती संपवायलादेखील तयार आहे, मात्र त्यापूर्वी सुदेश म्हशिलकरांनी फेसबुकवर जाहीर माफी मागावी, असं तिचं म्हणणं आहे. प्राचीच्या एका पोस्टवर 'ठरलं तर मग' फेम कल्पना म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी दिघे यांनी कमेंट केली आहे. 

इंडस्ट्रीमधील काहींना वाटतं सगळ्याच मुली त्यांच्यासाठी उपलब्ध असतात : प्राजक्ता कुलकर्णी-दिघे

अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी दिघे यांनी लिहिलंय की, "प्राची एकदम छान केलंस ही पोस्ट शेअर करुन. कारण इंडस्ट्रीमधील काही लोकांना वाटतं की, सगळ्याच मुली अशा असतात आणि त्यांच्यासाठी उपलब्ध असतात. हा त्यांचा गैरसमज दूर व्हायलाच हवा. काही लोकांमुळे आपली इंडस्ट्री बदनाम आहे, ती तरी होणार नाही. आम्ही इथे प्रामाणिकपणे काम करुन आमच्या फॅमिलीसोबत अगदी प्रामाणिकपणे राहतो." अशातच, प्राची पिसाटनं अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी दिघे यांच्या कमेंटवर कमेंट केली आहे. प्राची म्हणाली आहे की, "ताई, खूप खूप धन्यवाद. मलाही तुमचा अभिमान आहे. एक आई म्हणून तुम्ही कायमच आजूबाजूच्या अनेक मुलींना धाडसी होण्यासाठी प्रेरणा दिली आहे." 

काही लोकांना वाटतं सगळ्या मुली त्यांच्यासाठी उपलब्ध'; प्राची पिसाटला लोकप्रिय अभिनेत्रींचा पाठिंबा

गप्प नाही बसायचं.... : शिल्पा नवलकर 

'ठरलं तर मग' मालिकेच्या लेखिका आणि मालिकेत प्रतिमा ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनीही प्राचीच्या फेसबुक पोस्टवर कमेंट करत तिला पाठिंबा दिला आहे. शिल्पा यांनी म्हटलंय की, 'Way to Go प्राची, गप्प नाही बसायचं.' त्यावर प्राचीनं असं उत्तर दिलंय की, 'शिल्पा ताई गेल्या 12 तासांत तू पहिलीच महिला असशील जिनं मला 'गप्प बस' असं नाही सांगितलं. धन्यवाद.' प्राचीनं शिल्पा आणि प्राजक्ता यांच्या कमेंटचा स्क्रिनशॉटही इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यासोबतच प्राचीला अभिनेत्री मीरा जगन्नाथनंही पाठिंबा दर्शवला आहे.

काही लोकांना वाटतं सगळ्या मुली त्यांच्यासाठी उपलब्ध'; प्राची पिसाटला लोकप्रिय अभिनेत्रींचा पाठिंबा

नेमकं घडलंय काय? 

प्राची पिसाटनं फेसबुकवर शेअर केलेल्या एका स्क्रिनशॉर्टमुळे मराठी इंडस्ट्रीत खळबळ माजली. प्राचीनं अभिनेते सुदेश म्हशिलकरसोबतच्या चॅटचा स्क्रिनशॉर्ट शेअर केला. त्यावर सुदेश म्हशिलकरांनी प्राचीला काही आक्षेपार्ह्य मेसेज केले होते. त्यातला एक मेसेज होता की, "तुझा नंबर पाठव... तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये... कसली गोड दिसतेस.", तर दुसरा मेसेज होता की, "खूपच सेक्सी दिसायला लागलीस हल्ली...वाह." सुदेश म्हशिलकरांच्या मेसेजचा स्क्रिनशॉर्ट शेअर करताना प्राचीनं लिहिलं की, आणि मला हा स्क्रिनशॉट पोस्ट करायची इच्छा झाली... बायकोचा नंबर असेलच... तीही गोड आहे. बघ जरा तिच्याशी फ्लर्ट करायला जमतंय का सुदेश म्हशिलकर! ही पोस्ट डिलीट करायला सांगण्यासाठी कुठूनतरी नंबर मिळवशील आणि कॉल करशीलच.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Actress Casting Couch Experience: दिग्दर्शकाची 'वन नाईट स्टँड'ची मागणी, क्षणात 'तिनं' धुडकावली; कित्येक बड्या फिल्म्सना मुकली अन् मग...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
Embed widget