एक्स्प्लोर

Thane Crime:अत्याचाराच्या आरोपातून 15 दिवसांपूर्वी सुटला, पोलिसांनी पुन्हा प्रसिद्ध रिलस्टारच्या मुसक्या आवळल्या, घरात शस्त्रांचा साठा अन् ... नेमकं काय सापडलं?

Reelstar Surendra Patil: त्याच्याकडे सापडलेला शस्त्रसाठा नेमका कुठून आणि कशासाठी आणला याचा तपास सुरू आहे.

Thane Crime: डोंबिवलीतील दावडी परिसरात राहणाऱ्या कुख्यात रिल स्टार सुरेंद्र पाटील (Reelstar Surendra Patil) याच्या घरातून कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांनी मोठा हत्यारांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत 7 पिस्तूल, 371 काडतूस, तसेच तलवारी आणि चॉपर जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे, ही हत्यारे घरातील चपलांच्या स्टँडमध्ये लपवून ठेवण्यात आली होती, ही बाब समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. ( Crime News)

रविवारी पहाटेच्या सुमारास क्राईम ब्रांचच्या पथकाने छापा टाकत ही कारवाई केली. त्यानंतर सुरेंद्र पाटीलला अटक करण्यात आली असून त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्याकडे सापडलेला शस्त्रसाठा नेमका कुठून आणि कशासाठी आणला याचा तपास सुरू आहे. (Crime News)

अशोक खरातप्रमाणे महिलांशी संबंध?

या प्रकरणात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिस तपासात सुरेंद्र पाटील हा नाशिकच्या अशोक खरातप्रमाणेच अनेक महिलांशी संबंध ठेवत असल्याची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळण्याची चिन्हे आहेत.

क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी सर्जेराव पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. सुरेंद्र पाटील यापूर्वीही वादग्रस्त ठरला आहे. एका भामट्याने फसवल्यानंतर तो चर्चेत आला होता. त्यानंतर सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्याने अनेक वादग्रस्त रिल्स तयार केल्या. मानपाडा पोलिस ठाण्यात पोलिस अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून रिल बनवण्याचाही प्रकार त्याने केला होता.

15 दिवसांपूर्वी तो जेलमधून सुटला आता.. 

त्याच्यावर इंस्टाग्रामवर मैत्री करून दोन तरुणींवर बलात्कार केल्याचे आरोपही आहेत. अवघ्या 15 दिवसांपूर्वी तो जेलमधून सुटून आला होता. त्याच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात आठ गंभीर गुन्हे दाखल असून त्यात आर्म अॅक्टसह इतर कलमांचा समावेश आहे. 2023 साली त्याला एक वर्षासाठी तडीपारही करण्यात आले होते. दरम्यान, सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या या रिल स्टारचे अकाउंट बंद करण्याची मागणी जोर धरत आहे. आता पुढील तपासात पोलिस आणखी काय खुलासे करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

Alka Yagnik: अलका याज्ञिक गंभीर आजाराशी देतेय झुंज, दुर्मिळ आजारामुळे गायिका त्रस्त; नेमका कोणता आजार झालाय?

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget