सुपरस्टार थलपती विजय होणार तमिळनाडूचा पुढचा मुख्यमंत्री! अभिनेत्याच्या रोखठोक भाषणानंतर चाहत्यांमध्ये उत्साह
Thalapathy Vijay TVK Political Party : तमिळ सुपरस्टार थलपती विजय याने आता राजकारणात एन्ट्री घेतली आहे. त्याने पहिलं राजकीय भाषण केलं आहे. यानंतर चाहत्यांचा उत्साह वाढला आहे.
Thalapathy Vijay Political Party : दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय याने राजकारणात धमाकेदार एन्ट्री घेतली असून त्याने पहिलं राजकीय भाषण केलं आहे. थलपती विजयने दमदार आणि रोखठोक भूमिका मांडल्यानंतर त्याच्या चाहत्यांसह जनतेमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. थलपती विजयने तमिलगा वेत्री कझगम (टीवीके) या राजकिय पक्षाची स्थापना केली असून राज्याच्या राजकारणात दमदार एन्ट्री घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता पक्षाकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी भव्य रॅली आयोजित करण्यात आली होती. यावेळी हजारोंच्या संख्येने जमलेल्या जनतेला थलपती विजयने संबोधित केलं.
अभिनेता थलपती विजयची राजकारणात धमाकेदार एन्ट्री
दाक्षिणात्य अभिनेता थलपती विजय त्याच्या राजकारणातील प्रवेशामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता. गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा सुरु होती, मात्र आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. या सुपरस्टार थलपती विजयने रविवारी राजकारणात धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. भव्य रॅलीत त्याने जनतेला संबोधित करताना त्यांनी आपली पहिलं राजकिय संमेलन घेतलं. यावेळी विजय त्यांच्या राजकीय शैलीत दिसला. राजकारण हे चित्रपटाचं क्षेत्र नाही, उलट हे युद्धक्षेत्र आहे, असे यावेळी तो भाषणात म्हणाला.
View this post on Instagram
2026 च्या विधानसभा निवडणुकांकडे लक्ष
TVK पक्षाच्या कार्यक्रमासाठी दूर ठिकाणहून लोक आले होते. या परिषदेसाठी आलेले मदुराई येथील आयटी व्यावसायिक उदयकुमार यांनी आयएएनएसला प्रतिक्रिया देताना सांगितलं की, "विजयचा राजकारणात प्रवेश तामिळनाडू आणि तेथील लोकांसाठी चांगला आहे. राजकारणात येण्यापूर्वी त्याने गृहपाठ केला आहे आणि 2026 च्या विधानसभा निवडणुका हे त्याचं लक्ष्य आहे. मला आशा आहे की, तो तामिळनाडूचा पुढील मुख्यमंत्री होईल".
Full Speech Of chief @actorvijay 👏🥹💥#TvkVijayMaanadu pic.twitter.com/rBB9ifGq2r
— TVK Vijay Trends (@TVKVijayTrends) October 27, 2024
विजयला पाहण्यासाठी लाखोंचा जनसागर
विजयच्या भव्य परिषदेला लाखो लोकांनी हजेरी लावली. यावेळी सुमारे 2 लाख लोक उपस्थित होते, असं सांगितलं जात आहे. घटनास्थाळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तामिळनाडूच्या गृह विभागाने घटनास्थळी मोठी पोलीस बंदोबस्तही तैनात केला होता.
His ROAR 🔥🔥🔥 #TVKVijayMaanadu pic.twitter.com/KBkefsdpM6
— TVK Vijay Trends (@TVKVijayTrends) October 27, 2024
महत्त्वाच्या इतर बातम्या :