Thalapathy Vijay : थलापती विजयचा ट्विटरवर राडा..., 'बीस्ट' चित्रपटाचे ट्वीट ठरले या वर्षाचे सर्वाधिक रीट्वीट होणारे ट्वीट
Beast Tweet : थलापती विजयने त्याच्या 'बीस्ट' या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करणारे एक ट्वीट केलं होतं. मनोरंजन क्षेत्रातले या वर्षीचे ते सर्वाधिक रीट्वीट होणारे ट्वीट ठरलं आहे.
![Thalapathy Vijay : थलापती विजयचा ट्विटरवर राडा..., 'बीस्ट' चित्रपटाचे ट्वीट ठरले या वर्षाचे सर्वाधिक रीट्वीट होणारे ट्वीट Thalapathy Vijay s post on Beast most liked and retweeted tweet from film industry in India Thalapathy Vijay : थलापती विजयचा ट्विटरवर राडा..., 'बीस्ट' चित्रपटाचे ट्वीट ठरले या वर्षाचे सर्वाधिक रीट्वीट होणारे ट्वीट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/09/a1b4a4817a0e98402669e2136e35b2d7_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या दरम्यान, बॉलिवूड आणि टॉलिवूडलाही अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. तुलनेनं हे वर्ष फिल्म इंडस्ट्रीसाठी चांगलं ठरलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मोठ्या संख्येने चित्रपट सिनेमाघरात रीलीज होऊ शकल्या नाहीत. पण तरीही काही चित्रपटांनी चांगलाच धूमाकूळ घातला. साऊथचा सुपरस्टार थलापती विजयने त्याच्या 'बीस्ट' या चित्रपटाचे पोस्टर रीलीज करताना एक ट्वीट केलं होतं. बीस्टचे हे ट्वीट मनोरंजन क्षेत्रातले या वर्षीचे सर्वाधिक रीट्वीट करण्यात आलेलं ट्वीट ठरलं आहे.
चित्रपटाचे फॅन्स, विशेषत: तामिळ भाषिक प्रेक्षकांचे त्यांच्या आवडत्या कलाकारांबद्दल प्रेम हे टोकाचं असल्याचं अनेकदा सिद्ध झालं आहे. त्यामुळेच थलापती विजयच्या 'बीस्ट' या चित्रपटाचे पहिले पोस्टर्स रीलीज झाल्यानंतर त्याचं ट्वीट हे सर्वाधिक रीट्वीट झालं. या वर्षी 21 जानेवारीला हे ट्वीट करण्यात आलं असून त्याला जवळपास 34 लाख लाईक्स मिळाल्या आहेत.
#Beast pic.twitter.com/VgMlmH1Gno
— Vijay (@actorvijay) June 21, 2021
ट्विटरने या वर्षी सर्वाधिक रीट्वीट झालेल्या आणि सर्वाधिक लाईक करण्यात आलेल्या ट्वीट्सची माहिती दिली आहे. #OnlyOnTwitter या नावाने त्यांनी ही माहिती प्रकाशित केली आहे.
बीस्ट (Beast)
'मास्टर' या चित्रपटाच्या यशानंतर थलापती विजयने आपला दुसरा चित्रपट 'बीस्ट' प्रेक्षकांच्या भेटीला आणला. या चित्रपटाचे पोस्टर्स ट्विटरवर शेअर करुन थलापती विजयने चांगलाच धुमाकूळ घातला. या पोस्टर्सने चांगलीच कमाल केली. थलापती विजयचे हेच ट्वीट मनोरंजन क्षेत्रातले सर्वाधिक रीट्वीट करणारे ठरले.
थलापती विजय हा प्रामुख्याने तामिळ चित्रपटांत काम करतो. त्याचसोबत इतरही दाक्षिणात्य भाषेतील चित्रपटांत त्यानं काम केलं आहे. विजय थलापती हा तामिळ चित्रपटांतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)