एक्स्प्लोर

Telly Masala : सायलीमुळे प्रतिमाला सापडली सुभेदारांच्या घरची वाट ते "धर्मवीर -2"च्या ट्रेलरला खोऱ्यानं व्ह्यू; ओलांडला कोट्यवधींचा आकडा ;जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या..

Tharla Tar Mag : सायलीमुळे प्रतिमाला सापडली सुभेदारांच्या घरची वाट, सगळे प्रश्न सुटणार की नवे उभे ठाकणार?

'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) या स्टार प्रवाहवरील (Star Pravah) वाहिनीला सुरुवातीपासून प्रेक्षकांची चांगलीत पसंती मिळतेय. सध्या ही मालिका बऱ्याच रंजक वळणावर आली आहे. कारण आता सायलीमुळे प्रतिमाला सुभेदारांच्या घराची वाट सापडणार आहे. त्यामुळे सायलीमुळे पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरी आनंद वाहून येणार आहे. पण आता प्रतिमाच्या येण्याने अनेक प्रश्नांची उत्तरं सुटणार की नवे प्रश्न निर्माण होणार याचीही उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Dharmaveer 2 Movie Updates : "धर्मवीर -2"च्या ट्रेलरला खोऱ्यानं व्ह्यू; ओलांडला कोट्यवधींचा आकडा, 100 कोटींच्या कमाईंची रंगलीय चर्चा

 काही दिवसांपूर्वीच बहुप्रतिक्षीत आणि चर्चेत असलेल्या ''धर्मवीर-2''(Dharmaveer 2) या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. "धर्मवीर -2" च्या ट्रेलरला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळाला आहे. काही दिवसांमध्येच या चित्रपटाने दीड कोटींहून अधिक व्यूजचा आकडा ओलांडला. आता, बाजारात या चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांवर अंदाज सुरू झाले आहे. ट्रेड बाजारात हा चित्रपट 100 कोटींचा आकडा गाठणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. "धर्मवीर -2" हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Bigg Boss Marathi Season 5 Riteish Deshmukh : सलमान खान की अनिल कपूर? बिग बॉसचा कोणता होस्ट लय भारी? रितेश दादानं थेटच सांगितलं...

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएल्टी शो 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन (Bigg Boss Marathi Season 5) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या शोचे होस्टिंग महेश मांजरेकर यांच्याऐवजी रितेश देशमुख (Riteish Deshmukh) करणार आहे. त्यामुळे यंदाच्या सीझनची उत्सुकता चांगली ताणली  गेली आहे. जवळपास दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शो ऑन एअर जाण्यास सज्ज झाला आहे. बिग बॉस ओटीटीवर सध्या सलमान खान (Salman Khan) ऐवजी अनिल कपूर (Anil Kapoor) होस्टिंग करत आहेत. बिग बॉसचा कोणता होस्ट लय भारी कोणता आहे, यावर अभिनेता रितेश देशमुखने स्पष्टच उत्तर दिले.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Bigg Boss Marathi Season 5 Riteish Deshmukh : 'बिग बॉस मराठी'च्या घरात यंदा कोणाची एन्ट्री? होस्ट रितेश देशमुखनं धाडधाड सांगून विषयच संपवला

 जवळपास दोन वर्षांपासून प्रेक्षकांना बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची (Bigg Boss Marathi Season 5) उत्सुकता लागली होती. नव्या रुपात, नव्या ढंगात बिग बॉस मराठीचा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे. यंदाच्या सीझनचा होस्ट म्हणून अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) दिसणार आहे. तर, दुसरीकडे यंदाच्या सीझनमधील स्पर्धकांच्या नावाची उत्सुकता वाढली आहे.  'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक असणार याची चर्चा सुरू झाली आहे. बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या संभाव्य स्पर्धकांच्या नावावर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Ritiesh Deshmukh : होस्टिंगसाठी रितेशने मांजरेकरांकडून काही सल्ला घेतला का? म्हणाला, 'अजून आमचं...'

बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi Season 5) पाचवा सिझन येत्या 28 जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिझनमध्ये कोणते लाडके कलाकार हे बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी होणार याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली असल्याचं पाहायला मिळतंय. बिग बॉसच्या पाचव्या सिझनची घोषणा झाली आणि रसिकांची प्रतीक्षा अखेर संपली. पण पहिल्याच प्रोमोमध्ये एक मोठं सरप्राईजही चाहत्यांना मिळालं होतं. या सिझनचं होस्टिंग हे अभिनेता रितेश देशमुख (Ritiesh Deshmukh) करणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

 Rahat Fateh Ali Khan Net Worth : तस्करीचा आरोप, भारतात 8 वर्षांपासून बंदी; पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानची संपत्ती किती?

 प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) यांना दुबई विमानतळावर अटक करण्यात आल्याचे वृत्त समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. राहत फतेह अली खान यांनी हे वृत्त फेटाळून लावत कोणत्याही चर्चांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन चाहत्यांना केले. राहत फतेह अली खान हे याआधीही काही गैरप्रकार केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आले होते.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोधHasan Mushrif On Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? मुश्रीफ काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget