Tharla Tar Mag : सायलीमुळे प्रतिमाला सापडली सुभेदारांच्या घरची वाट, सगळे प्रश्न सुटणार की नवे उभे ठाकणार?
Tharla Tar Mag : स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेत सायली प्रतिमाला सुभेदारांच्या घरी येऊन येते. त्यामुळे मालिका सध्या रंजक वळणावर आहे.

Tharla Tar Mag : 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) या स्टार प्रवाहवरील (Star Pravah) वाहिनीला सुरुवातीपासून प्रेक्षकांची चांगलीत पसंती मिळतेय. सध्या ही मालिका बऱ्याच रंजक वळणावर आली आहे. कारण आता सायलीमुळे प्रतिमाला सुभेदारांच्या घराची वाट सापडणार आहे. त्यामुळे सायलीमुळे पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरी आनंद वाहून येणार आहे. पण आता प्रतिमाच्या येण्याने अनेक प्रश्नांची उत्तरं सुटणार की नवे प्रश्न निर्माण होणार याचीही उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
सध्या अर्जुन आणि सायली प्रियाकडून वात्सल्य आश्रम प्रकरणातील काही महत्त्वाच्या गोष्टी काढून घेण्याचा प्रयत्न करतायत. मधूभाऊंना सोडवण्यासाठी सायली आणि अर्जुनची ही सगळी धडपड सुरु आहे. पण या सगळ्यात सायलीला प्रतिमाचा शोध लागतो. त्यामुळे आता सायली प्रतिमाला घेऊन सुभेदारांच्या घरी येते.
प्रतिमा सुभेदारांच्या घरी येणार
प्रतिमाचा मृत्यू झाला असल्याचं डाव प्रिया आणि रवीराजच्या भावाने रचला होता. तो डाव यशस्वी देखील झाला. त्यामुळे आता प्रतिमा या जगात नाही, याची खात्री रविराजला पटली आहे. पण आता सायली मात्र प्रतिमाला परत घेऊन आल्याने प्रियाचा डाव पुन्हा एकदा फिसकटणार का याचीही उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
प्रतिमाच्या येण्याने सुभेदारांच्या घरी आनंद
प्रतिमाला सुभेदारांच्या दारात पाहून पूर्णाआज्जी भावूक होते. तसेच घरात सगळ्यांनाही आश्चर्याचा सुखद धक्का बसतो. पण आता प्रतिमाला पाहून रविराजचं काय होणार आणि प्रियाचा डाव संपणार का? याची उत्सुकता लागून राहिली आहे. येत्या 26 जुलै रोजी मालिकेचा हा विशेष भाग प्रदर्शित करण्यात येणार आहे.

मालिका रंजक वळणावर
पूर्णा आज्जींनी सायलीला सून म्हणून स्वीकारलं आहे. पण त्यावेळी त्यांनी प्रियासाठी सुभेदारांच्या घराची दारं बंद केली होती. पण अर्जुनमुळे पूर्णा आज्जीने पुन्हा एकदा प्रियाला सुभेदारांच्या घरात येण्याची परवानगी मिळाली. प्रियाकडून सत्य वदवून घेण्यासाठी अर्जुन तिला अलिबागला घेऊन जातो. तिथे अर्जुन आणि प्रियाला एकत्र डान्स करताना पाहून सायली भयंकर चिडते.
ही बातमी वाचा :
Ritiesh Deshmukh : होस्टिंगसाठी रितेशने मांजरेकरांकडून काही सल्ला घेतला का? म्हणाला, 'अजून आमचं...'
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग





















