Telly Masala : शाहरुख खान 'आयपीएल' दरम्यान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात ते मानसी नाईक पुन्हा लग्नगाठ बांधणार? प्रेमात पडल्याची अभिनेत्रीने दिली कबुली
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
IPL 2024 : शाहरुख खान 'आयपीएल' दरम्यान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात; धूम्रपानाच्या नव्या व्हिडीओमुळे कारवाई होणार?
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या सिनेमामुळे चर्चेत असतो. पण आता तो कोणत्याही सिनेमामुळे चर्चेत नसून 'आयपीएल 2024'मुळे (IPL 2024) चर्चेत आहे. कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrise Hydrabad) हा सामना पाहायला किंग खान स्टेडियममध्ये गेला होता. या सामन्यादरम्यानचा शाहरुखचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख धूम्रपान करत असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Lata Mangeshkar : "कितीही पैसे दिले तरी लग्नात गाणार नाही"; लता दीदींनी नाकारलेली कोट्यवधींची ऑफर
देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या लाडका लेक अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट यांचा रॉयल प्री-वेडिंग कार्यक्रम नुकताच पार पडला. प्री-वेडिंगसाठी गुजरातमधील जामनगरमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींनी गर्दी केली होती. तीन दिवस चालणाऱ्या प्री-वेडिंगला भारतासह परदेशातील दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. हॉलिवूडची प्रसिद्ध पॉप स्टार रिहानापासून (Rihana) दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh), अरिजीत सिंह (Arjit Singh), श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) अशा मोठ्या कलाकारांनी गाणी गायली. पण या सगळ्यात चर्चेत आल्या त्या दिवंगत गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आणि कंगना रनौतची (Kangana Ranaut).
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Manasi Naik : मानसी नाईक पुन्हा लग्नगाठ बांधणार? प्रेमात पडल्याची अभिनेत्रीने दिली कबुली
अभिनय, नृत्य आणि मोहक अदा यांमुळे मानसी नाईक (Manasi Naik) ही कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आलीये. तसेच तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळेही मानसी नाईक चर्चेचा विषय असते. पण मानसी फ्रंटवर आली ती तिच्या घटस्फोटामुळे. त्यावेळी अभिनेत्रीला बऱ्याच ट्रोलिंगला देखील सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मानसीने पुन्हा एकदा प्रेमात पडल्याची कबुली दिली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Jaywant Wadkar : 'नवरा माझा नवसाचा'मध्ये प्रशांतही होता पण रिडिंगच..., प्रशांत दामले चित्रपटात न दिसण्याचं जयवंत वाडकरांनी सांगितलं कारण
सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) दिग्दर्शित 'नवरा माझा नवसाचा' (Navra Maza Navsacha ) हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या तितकाच आवडीचा आहे. त्यातच नुकतच 'नवरा माझा नवसाचा 2' (Navra Maza Navsacha 2) या चित्रपटाची घोषणा झाली असून या चित्रपटाच्या शुटींगला देखील सुरुवात झाली आहे. नवरा माझा नवसाचा या चित्रपटात अनेक कलाकारांनी पाहुणे कलाकार म्हणून काम केलं. त्यामुळे अनेक कलाकार मंडळींनी हा चित्रपट एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Madhuri Dixit : माधुरी दीक्षितचा स्वभाव कसा आहे? वंदना गुप्तेंनी सांगितला किस्सा
बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) नेहमीच आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेत असते. फक्त 90 च्या दशकातील तरुणाई नव्हे तर आजच्या काळातील लहान मुलांपासून ते वयस्कर मंडळींपर्यंत सर्वांनाच माधुरी आवडते. त्यामुळे माधुरी दीक्षित संबंधित प्रत्येक अपडेट चाहते जाणून घेत असतात. माधुरीचा चाहतावर्ग हा फक्त सर्वसामान्य प्रेक्षकवर्ग नसून बॉलिवूडसह (Bollywood) मराठी मनोरंजनसृष्टीतही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. आता मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte) यांनी माधुरीच्या स्वभावावर भाष्य केलं आहे.