Manasi Naik : मानसी नाईक पुन्हा लग्नगाठ बांधणार? प्रेमात पडल्याची अभिनेत्रीने दिली कबुली
Manasi Naik : अभिनेत्री मानसी नाईक ही तिच्या घटस्फोटानंतर बरीच चर्चेत आली होती. पण आता या अभिनेत्रीने पुन्हा एकदा प्रेमात पडल्याची कबुली दिली आहे.
Manasi Naik : अभिनय, नृत्य आणि मोहक अदा यांमुळे मानसी नाईक (Manasi Naik) ही कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आलीये. तसेच तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळेही मानसी नाईक चर्चेचा विषय असते. पण मानसी फ्रंटवर आली ती तिच्या घटस्फोटामुळे. त्यावेळी अभिनेत्रीला बऱ्याच ट्रोलिंगला देखील सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मानसीने पुन्हा एकदा प्रेमात पडल्याची कबुली दिली आहे.
19 जानेवारी 2021 रोजी मानसीने प्रदीपसोबत लग्नगाठ बांधली होती. पण संसार सुरु झाल्यानंतर अल्पावधीतच मानसीने प्रदीपपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. प्रदीपने तिची फसवणूक केल्याचंही यावेळी तिनं म्हटलं होतं. त्यावेळी नेटकऱ्यांनी देखील मानसीला बरच ट्रोल देखील केलं. त्यावेळी मानसीनं म्हटलं होतं की, माझा अजुनही प्रेमावर विश्वास आहे,मला पुन्हा एकदा कोणावर तरी प्रेम करायचं आहे. त्यातच आता नुकतच तिने अमृता राव यांच्या अमृता फिल्म्स या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे.
होय मी पुन्हा प्रेमात पडलेय - मानसी नाईक
या मुलाखतीदरम्यान आता अट्टाहासाने मी पुन्हा एकदा प्रेमात पडलेय. त्यामुळे आता एक स्त्री म्हणून मला तो प्रवास पुन्हा एकदा अनुभवयाचा आहे. आता सगळे म्हणतील की ही लगेच प्रेमात पडली. त्यावर मानसीनं म्हटलं की मी स्वत:च्या प्रेमात पुन्हा एकदा पडले आहे. पण तुम्हाला जे काही करायचं आहे ते डोळे उघडे ठेवून करायंच. प्रेम ही खूप सुंदर गोष्टी आहे. एकदा मी प्रेमात पडून बघितलं पण आता प्रेमात माला उभरायचं आहे.
मला नक्कीच आई व्हायचं आहे - मानसी नाईक
यावेळी मानसीला हल्लीच्या मुलींना मुलबाळ नको असतं यावर तुझं मत काय असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तिने म्हटलं की, 'मूल होण्याचा प्रवास फक्त आपण आई-बाबा होणं यापुरता मर्यादित नसतो. याउलट आपले आई-बाबा आजी-आजोबा होणार हा गोडवा खूप मोठा असतो. फक्त त्यांचा आनंद पाहण्यासाठी तरी मला नक्कीच आई व्हायचंय. आई होणं ही जगातली सर्वात सुंदर गोष्ट आहे. आई झाल्यावर एखादी स्त्री खऱ्या अर्थाने पूर्णत्वाला येते. आजकालच्या काळात वय जास्त झालं की, प्रत्येक बाईपुढे विविध समस्या, प्रश्न निर्माण होतात. लग्न कधी होणार वगैरे असे सगळे प्रश्न विचारले जातात. माझ्या बाबतीत सांगायचं झालं, तर मला मूल हवंय आणि माझे विचार मी आई-बाबांना सांगितले आहेत.'